Petrol: पेट्रोल महाग होण्याची अफवा; मध्यरात्री राज्यातील ५ जिल्ह्यात पेट्रोल पंपावर उडाली झुंबड, पाहा VIDEO

Iran-Israel War: इराण-इस्राइल युद्धामुळे पेट्रोल महाग झाल्याची अफवा उडाली. त्यामुळे राज्यातील ५ जिल्ह्यांमधील पेट्रोल पंपावर वाहनचालकांनी मध्यरात्री पेट्रोल भरण्यासाठी मोठी गर्दी केली. पाण्याच्या बॉटल आणि कॅन घेऊन सर्वजण पेट्रोल पंपावर आले.
Petrol: पेट्रोल महाग होण्याची अफवा; मध्यरात्री राज्यातील ५ जिल्ह्यात पेट्रोल पंपावर उडाली झुंबड, पाहा VIDEO
Petrol Price Hike Saam Tv
Published On

Summary -

• इराण-इस्राइल युद्धामुळे पेट्रोल महाग होण्याची अफवा
• मध्यरात्री पेट्रोल पंपावर वाहनधारकांची गर्दी
• सोशल मीडियामुळे अफवा पसरली
• प्रशासनाकडून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

इराण-इस्राइलमध्ये युद्धाचा भडका उडाला आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ले सुरू आहेत. या युद्धाचा परिणाम आता जगभरात होताना दिसत आहे. एकीकडे शेअर मार्केट पडलं तर दुसरीकडे सोनं-चांदीच्या दरात देखील मोठी वाढ होताना दिसत आहे. अशातच आता या युद्धामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये मोठी वाढ झाली असल्याची अफवा उडाली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मध्यरात्री पेट्रोल भरण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. याचे व्हिडीओ समोर आले आहेत.

अमरावती -

अमरावतीच्या अंजनगाव सुर्जी तालुक्यातील निमखेड बाजारामध्ये पेट्रोल-डिझेलच्या भाव वाढीची अफवा उडाली. रात्री पेट्रोल भरण्यासाठी वाहन चालकांची पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. अमेरिका-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल-डिझेलचे भाव मध्यरात्री वाढण्याची अफवा पसरली होती. अनेकांनी मध्यरात्रीच पेट्रोल पंप गाठत गाडीच्या टाकी फुल केल्या. तर अनेक जण कॅन घेऊन पेट्रोल नेण्यासाठी पेट्रोल पंपावर आले होते.

Petrol: पेट्रोल महाग होण्याची अफवा; मध्यरात्री राज्यातील ५ जिल्ह्यात पेट्रोल पंपावर उडाली झुंबड, पाहा VIDEO
Iran War: इराणच्या शाहीद-136 ड्रोनमुळे 14 देशांत हाय अलर्ट जारी, काय आहेत वैशिष्ट्ये?

नांदेड -

अखाती देशात सुरु असलेल्या युद्धाचा फटका पेट्रोल विक्रीवर होणार आणि पेट्रोल महागणार अशी अफवा सोशल मीडियावर पसरली. त्यानंतर नांदेडमध्ये पेट्रोल पंपावर वाहनधारकांनी अचानक एकच गर्दी केली. नांदेड शहरातील बाफना परिसरातील बाबा पेट्रोल पंपवर वाहनधारकांची गर्दी पहायला मिळाली. पेट्रोल पंपावर वाहनचालकांच्या रांगा लागल्या होत्या. पेट्रोल मिळणार नाही या अफवेमुळे अनेकांनी टँक फुल देखील केले. दरम्यान पेट्रोल पंप बंद होणार नाही मोठा साठा उपलब्ध असल्याची माहिती पेट्रोल पंप चालक चैतन्य बापू देशमुख यांनी सांगितली.

Petrol: पेट्रोल महाग होण्याची अफवा; मध्यरात्री राज्यातील ५ जिल्ह्यात पेट्रोल पंपावर उडाली झुंबड, पाहा VIDEO
Iran-Israel War: इराण-इस्रायलच्या युद्धाचा भारताला मोठा फटका; फक्त २५ दिवस पुरेल इतकाच देशात तेलसाठा

परभणी -

युद्धाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल महाग होणार आहे अशा अफवेने नांदेड पाठोपाठ परभणीत ही पेट्रोल पंपांवर मोठी गर्दी उसळल्याचे चित्र निर्माण झाले आहे.शहरातील भरोसे, दुर्रानी तसेच आर आर पेट्रोल पंपासह अनेक पंपवर दुचाकी चालकांनी मोठी गर्दी केली. ज्यामुळे पेट्रोल पंप चालक ही हैराण झाले आहे. प्रशासनाने ही अफवा असून इंधन तुटवडा होणार नाही असे आवाहन करावे जेणेकरून ही गर्दी कमी होऊन नागरिक अफवांना बळी पडणार नाहीत अशी मागणी केली जात आहे.

Petrol: पेट्रोल महाग होण्याची अफवा; मध्यरात्री राज्यातील ५ जिल्ह्यात पेट्रोल पंपावर उडाली झुंबड, पाहा VIDEO
Iran-US War: भारताचं मौन आगतिक की व्यवहारिक? इराणबाबत धोरणाचा भारताला फटका बसणार?

संभाजीनगर -

इस्राईल–इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशभरात इंधनदर वाढीची चर्चा सुरू असताना छत्रपती संभाजी नगर शहर आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागातल्या अनेक ठिकाणी काल रात्री पेट्रोल- डिझेल खरेदीसाठी वाहनधारकांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. युद्धामुळे कच्च्या तेलाची आयात ठप्प होणार, पेट्रोल पंप बंद पडणार अशा अफवांमुळे मंगळवारी रात्री उशिरापर्यंत पेट्रोल पंपांवर वाहनधारकांची मोठी गर्दी पैठण तालुक्यातील बिडकीन गावामध्ये झाली होती. इंधनाचा साठा करून ठेवण्यासाठी अनेकांनी दुचाकी, चारचाकी तसेच डब्यांमध्ये पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी रांगा लावल्या. निलजगाव रोडवरील तसेच शहरातील इतर पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. काही पंपांवरील साठा तात्पुरता संपल्याने ते ‘ड्राय’ झाल्याची माहितीही समोर आली.

Petrol: पेट्रोल महाग होण्याची अफवा; मध्यरात्री राज्यातील ५ जिल्ह्यात पेट्रोल पंपावर उडाली झुंबड, पाहा VIDEO
Iran Supreme Leader: खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराणला मिळाला नवा सर्वोच्च नेता;कोणाला मिळाली जबाबदारी?

हिंगोली -

हिंगोलीच्या वसमत शहरात पेट्रोल पंपावरील इंधन संपणार असल्याची अफवा पसरल्याने रात्री आणि भल्या पहाटे नागरिकांनी पेट्रोल भरण्यासाठी मोठी गर्दी केली होती. दरम्यान यात दुचाकी चालक सगळ्यात आघाडीवर होते. तर अनेकांनी बिसलरी बॉटल घेऊन पेट्रोल मिळविण्याचा प्रयत्न सुरू केला होता.

Petrol: पेट्रोल महाग होण्याची अफवा; मध्यरात्री राज्यातील ५ जिल्ह्यात पेट्रोल पंपावर उडाली झुंबड, पाहा VIDEO
Iran-US War: 'होर्मुझमध्ये जहाज दिसलं की पेटवून देणार'; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणचा जगाला इशारा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com