मध्य-पूर्वेतील युद्धामध्ये इराणच्या शाहीद-१३६ ड्रोन सध्या सर्वात मोठा गेम चेंजर ठरला आहे. याला सुसाईड ड्रोन असे देखील म्हटले जाते. हा ड्रोन लक्ष्यावर आदळून त्याचा विनाश करतो. शाहीद-१३६ ड्रोनमुळे १४ देशांमध्ये हाय अलर्ट देण्यात आला आहे. अवघ्या २० ते ५० हजार डॉलरमध्ये तयार होणाऱ्या या ड्रोनने अमेरिका आणि इस्राइलसह १४ देशांची अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणांना जेरीस आणले आहे. स्वस्त किंमत २००० किमीची रेंज आणि अटॅक करण्याची क्षमता त्यामुळे हा ड्रोन संपूर्ण जगासाठी डोकेदुखी ठरला आहे.
- २००० किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर मारा करण्यास सक्षम
- प्रगत जीपीएस प्रणालीमुळे शत्रूंच्या तळांवर अत्यंत अचूकपणे हल्ले करता येतात.
- अतिशय कमी उंचीवरून उड्डाण करत शत्रूची हवाई संरक्षण यंत्रणा भेदण्यास यशस्वी.
- एकाच वेळी शेकडो ड्रोन डागून शत्रूची संरक्षण प्रणाली निकामी करण्याची रणनीती.
- जेट इंजिन आणि आधुनिक डिझाइनमुळे हे ड्रोन्स हाय-स्पीड आणि अदृश्य राहतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.