Petrol-Diesel Price : पेट्रोल-डिझेल महागणार? इराण-इस्त्राइल युद्धामुळे दर वाढीचा स्फोट होणार, लेटेस्ट अपडेट

petrol diesel price hike : इराण-इस्त्राइल संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किमती ८० डॉलरच्या पुढे गेल्या आहेत. भारतात पेट्रोल-डिझेल दर सध्या स्थिर असले तरी जागतिक बाजारातील वाढ कायम राहिल्यास दरवाढीचा धोका निर्माण होऊ शकतो.
Petrol-Diesel Price
Petrol-Diesel PriceSaam Tv
Published On

will petrol prices increase in India due to Iran Israel war : इराण आणि इस्रायलमधील संघर्षामुळे जागतिक बाजारपेठेत खळबळ उडाली आहे. या युद्धाच्या परिणामामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमतीने ८० डॉलर्स प्रति बॅरलचा टप्पा ओलांडला आहे. या वाढत्या किमतींमुळे भारतातही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होणार का? अशी भीती सर्वसामान्यांमध्ये निर्माण झाली आहे. रिपोर्ट्सनुसार, भारताकडे फक्त १० दिवस पुरेल इतकाच कच्च्या तेलाचा साठा शिल्लक आहे. त्यामुळे दरवाढीचा स्फोट होणार का? याची चिंता भारतीयांना सतावत आहे.

अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांमुळे आणि तेहरानने केलेल्या प्रत्युत्तर हल्ल्यांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती जवळपास ९ टक्क्यांनी वाढल्या आहेत. पण भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमती नजीकच्या भविष्यात वाढण्याची शक्यता नाही, असे सूत्रांनी सांगितले. जागतिक बेंचमार्क ब्रेंट क्रूड ८० डॉलर्स प्रति बॅरलच्या जवळ पोहोचला आहे. तर अमेरिकेत व्यापार होणारे कच्चे तेल ८.६ टक्क्यांनी वाढून ७२.७९ डॉलर्सवर पोहोचले आहे.

Petrol-Diesel Price
Property Right : सासू-सासऱ्याच्या संपत्तीवर जावई-सुनेचा हक्क असतो का? कायदा काय सांगतो

भारत आपल्या गरजेच्या ८८ टक्क्यांहून अधिक तेल आयात करतो. त्यामुळे जागतिक बाजारात भाव वाढले की त्याचा परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर होतो. सध्याच्या घडीला तेल कंपन्यांनी भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही मोठा बदल केलेला नाही. पण जर कच्च्या तेलाचे भाव असेच वाढत राहिले, तर येणाऱ्या काळात इंधन दरवाढीचे संकट ओढवू शकते, असा अंदाज वर्तवला जातोय. इंधन महागले तर मालवाहतुकीचा खर्च वाढतो, ज्याचा थेट परिणाम भाजीपाला आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईवर होतो.

Petrol-Diesel Price
मोठी बातमी! महाराष्ट्रातील खासदार अडकले इराण-इस्रायल युद्धात, दुबईतून आली महत्त्वाची अपडेट

एप्रिल २०२२ पासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर आहेत. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) सारख्या पेट्रोलियम कंपन्या किमती जास्त असताना तोटा सहन करत आहेत आणि दर कमी असताना नफा कमवत आहेत. पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि आसाम सारख्या महत्त्वाच्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत. त्यामुळे सरकार सध्या पेट्रोल डिझेलच्या किंमती स्थिर ठेवण्यावर भर देऊ शकते. सध्या पेट्रोल डिझेलचे दर स्थिर आहेत, पण युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किंमती वाढत राहिल्या तर दरवाढीचा भडका उडण्याची शक्यता नाकारू शकत नाही.

Petrol-Diesel Price
Sanju Samson : सूर्याने उडवली होती थट्टा, आता संजूने मैदानातच जिरवली,सूर्यकुमार यादवचा'तो' जुना व्हिडिओ झाला व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com