Palghar Tourism : खिशात फक्त ५०० रुपये अन् सुट्टी एकच दिवस? मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे 'हे' बेस्ट डेस्टिनेशन

Shreya Maskar

कोहोज किल्ला

कोहोज किल्ला हा महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील वाडा-मनोर मार्गावर वाघोडे गावाजवळ वसलेला आहे. मुंबईजवळ वन डे ट्रिपसाठी हे खास लोकेशन आहे.

Fort | google

ऐतिहासिक किल्ला

कोहोज किल्ला सुमारे ८०० वर्षे जुना आणि ३२०० फूट उंचीचा एक प्रमुख ऐतिहासिक किल्ला आहे. या किल्ल्याला इतिहासात खूप मोठे महत्त्व आहे.

Fort | google

कोणी बांधला?

कोहोज किल्ला जुना मध्ययुगीन लष्करी गिरीदुर्ग आहे. कोहोज किल्ला भोज वंशाच्या राजाने बांधला असे मानले जाते, जो नंतर १६व्या शतकात पोर्तुगीजांनी गुजरातच्या राजाकडून जिंकून घेतला.

Fort | google

पाझर तलाव

कोहोज किल्लाच्या परिसरात निसर्गरम्य पाझर तलाव वसलेला आहे. या किल्ल्यावर माणसाच्या आकाराचे नैसर्गिक सुळके आहेत, जे या परिसराचे मुख्य वैशिष्ट्य मानले जातात.

Talao | google

जंगल ट्रेकिंग

कोहोज किल्ल्यापर्यंत जंगल ट्रेकिंग करून जाता येते. तुम्ही येथे मित्रांसोबत वन डे ट्रिप प्लान करू शकता. येथील निसर्ग सौंदर्य पावसाळ्यात , हिवाळ्यात खुलते.

Jungle Trekking | google

किल्ल्याचा परिसर

कोहोज किल्ल्यावर भक्कम तटबंदी, बुरुज आणि खडकात कोरलेली अनेक पाण्याची टाकी पाहायला मिळतात.

Fort Area | google

पालघर पर्यटन स्थळे

पालघर येथे जव्हार, दादर-कोपरा धबधबा, केळवा व दाहाणू-बोर्डीचे समुद्रकिनारे, वसईचा किल्ला आणि महालक्ष्मी मंदिर ही प्रमुख आकर्षणे आहेत.

Palghar | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

fort | google

NEXT : सूर्यास्ताचा नजारा अन् कोकण प्रदेशाचे सुंदर दृश्य, 'येथे' अनुभवता येतो ट्रेकिंगचा थरार

Maharashtra Tourism | saam tv
येथे क्लिक करा...