Kalyan : मकोका आरोपीला शिंदे गटाकडून राजकीय आश्रय? भाजप नेत्याच्या आरोपावरुन महायुतीत वादाची ठिणगी

Maharashtra Politics : महेश पाटील यांनी पक्षातीलच काही लोक मोक्का आरोपी कुणाल पाटीलला पाठिंबा देत असल्याचा धक्कादायक आरोप केला. धमक्या आणि दडपण वाढल्याने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून या प्रकरणामुळे कल्याण-डोंबिवलीत खळबळ उडाली आहे.
Kalyan : मकोका आरोपीला शिंदे गटाकडून राजकीय आश्रय? भाजप नेत्याच्या आरोपावरुन महायुतीत वादाची ठिणगी
Kalyan NewsSaam Tv
Published On
Summary

महेश पाटील यांनी मोक्का आरोपीला पक्षातील लोक सपोर्ट करत असल्याचा दावा

धमक्या मिळाल्याने भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय

खासदारांना माहिती देऊनही कारवाई न झाल्याचा आरोप

या प्रकरणामुळे कल्याण-डोंबिवलीत राजकीय खळबळ आणि नव्या वादाला तोंड

संघर्ष गांगुर्डे ( कल्याण - डोंबिवली )

कल्याण-डोंबिवलीतील राजकीय वातावरणात खळबळ उडवणारा गंभीर आरोप समोर आला आहे. मोक्काचा आरोपी कुणाल पाटील याला आमच्या पक्षातीलच लोक सपोर्ट करत आहेत. दोन दिवसांपासून मी प्रचंड दडपणाखाली होतो,असा थरारक खुलासा महेश पाटील यांनी केला असून, याच कारणामुळे त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केल्याची घोषणा केली आहे.

महेश पाटील यांनी सांगितले की, आरोपी कुणाल पाटील मोक्काखाली असूनही मुक्तपणे फिरत आहे. याबाबत त्यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनाही माहिती दिली होती. कुणाल पाटील फिरत असल्याची माहिती दिल्यानंतरही काहीच कारवाई झाली नाही. उलट त्यांचे काका वडार पाटील यांनी मला आणि माझ्या मुलाला मारण्याची धमकी दिली,असा गंभीर आरोप त्यांनी केला.

Kalyan : मकोका आरोपीला शिंदे गटाकडून राजकीय आश्रय? भाजप नेत्याच्या आरोपावरुन महायुतीत वादाची ठिणगी
MSRTC चा मोठा निर्णय! शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ८०० ते १००० बस दररोज उपलब्ध करून देणार, प्रताप सरनाईकांची घोषणा

याप्रकरणी सर्वात चिंताजनक बाब म्हणजे, आरोपीला विरोध करण्याऐवजी पक्षातील काही लोकच त्याला पाठिंबा देत असल्याचा आरोप महेश पाटील यांनी स्पष्टपणे केला. माझ्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे मी मोठा निर्णय घेत आज भाजपमध्ये प्रवेश केला,असे त्यांनी सांगितले.

Kalyan : मकोका आरोपीला शिंदे गटाकडून राजकीय आश्रय? भाजप नेत्याच्या आरोपावरुन महायुतीत वादाची ठिणगी
Maharashtra Politics : मराठवाड्यात सगे-सोयऱ्यांचे वर्चस्व, आमदारांची - मंत्र्यांची मुले-पत्नी निवडणुकीच्या रिंगणात

या प्रकरणानंतर स्थानिक राजकारणात खळबळ उडाली असून, संबंधित पक्षाकडून यावर अधिकृत प्रतिक्रिया अपेक्षित आहे. दरम्यान, पाटील यांनी केलेल्या आरोपांमुळे मोक्का आरोपीला मिळणारा राजकीय पाठिंबा आणि धमकीचे गंभीर पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com