Maharashtra Budget Session Live Updates Saamtv
महाराष्ट्र

Maharashtra Budget Session : सरकारला आशा सेविकांची कदर नाही, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक, VIDEO

Maharashtra Budget Session Live Updates: सरकारला आशा सेविकांची कदर नाही, आशा सेविकांच्या मागण्या मान्य करा, अशी मागणी करत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

Gangappa Pujari

Maharashtra Budget Session 2024:

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात होत आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आशा सेविकांच्या आंदोलनावरुन सरकारला धारेवर धरले. सरकारला आशा सेविकांची कदर नाही, आशा सेविकांच्या मागण्या मान्य करा, अशी मागणी करत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

मुंबईतील (Mumbai) आझाद मैदानावर आशा सेविकांचे वेतनवाढीसह अन्य प्रलंबित मागण्यासांठी आंदोलन सुरू आहे. कुपोषित बालकांची सेवा करणाऱ्या आशा सेविकांची सरकारला कदर नाही, अशी टीका विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी आज विधानसभेत केली.

त्याचबरोबर सरकारने राज्यातील आशा सेविकांच्या मागण्या मान्य कराव्यात. त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी यावेळी सरकारकडे केली. वाढीव वेतनासह अन्य मागण्यांबाबत जोपर्यंत शासन निर्णय जारी होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याची आशा सेविकांची भूमीका आहे. या आशा सेविकांना सरकारने न्याय दिला पाहिजे. अशी भूमिका विजय वडेट्टीवार यांनी मांडली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, विजय वडेट्टीवार यांच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक असल्याचे उत्तर विजय वडेट्टीवार यांनी केले. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या बरोबर अनेकदा चर्चा केली आहे. सरकार सकारात्मक आहे. पण ते सांगतीलं तसं कसं होईल, आर्थिक परिस्थिती पाहायला लागते. आम्ही त्यांच्याशी पुन्हा चर्चा करु.. असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shevgyachya Shenganchi Bhaji Recipe : भाकरी अन् झणझणीत शेवग्याच्या शेंगांची भाजी, एक घास खातच येईल गावाची आठवण

Maharashtra Live News Update: पुण्यात पाण्याच्या शोधात असणारा बिबट्या विहिरीत पडला

Seviyan Kheer Recipe: सणासुदीला घरी आलेल्या पाहुण्यासाठी झटरपट बनवा स्वादिष्ट शेवयाची खीर, वाचा सोपी रेसिपी

संतापजनक! बाथरूमच्या फलकावर लावला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो

वीर सावरकर बदनामी प्रकरणात मोठी अपडेट; सात्यकी सावरकरांकडून अचानक तो अर्ज दाखल, कोर्टात नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT