Farmer Protest : शेतकरी कर्मचाऱ्यांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार; विविध मागण्यांवर शेतकरी ठाम

Farmer News : विविध आदिवासी संघटनांनी पायी मोर्चा सुरू केला आहे. हा मोर्चा नाशिक शहराच्या प्रवेशद्वारावर आला असून आज दुपारी तीन वाजेपर्यंत मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकणार आहे
Farmer Protest
Farmer ProtestSaam TV
Published On

तबरेज शेख

Farmer :

शेतकरी व कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मांसवादी कम्युनिस्ट पक्ष व विविध आदिवासी संघटनांनी पायी मोर्चा सुरू केला आहे. हा मोर्चा नाशिक शहराच्या प्रवेशद्वारावर आला असून आज दुपारी तीन वाजेपर्यंत मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकणार आहे. या मोर्चेकरांच्या मागण्यांसाठी उद्या मंगळवारी मंत्रालयात बैठक होण्याची शक्यता प्रशासकीय सूत्रांनी व्यक्त केली आहे.

शेतकरी व कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मांसवादी कम्युनिस्ट पक्ष किसान सभा यांच्या वतीने 21 फेब्रुवारीपासून जिल्ह्यातील चांदवड निफाड सुरगाणा, पेठ, दिंडोरी, कळवण सटाणा इगतपुरी सिन्नर, सह इतर तालुक्यातील आदिवासी बांधव हजारोंच्या संख्येने लालबावटा हातामध्ये घेऊन पायी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर निघाले आहेत.

या मोर्चाला थांबविण्यासाठी पालकमंत्री दादा भुसे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी या मोर्चाचे नेतृत्व करणारे माजी आमदार जीवा पांडू गावित, सावळीराम पवार, इरफान शेख यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. रविवारी सकाळी ही बैठक यशस्वी होऊ शकली नाही त्यामुळे हा मोर्चा सुरू आहे.

हा मोर्चा नाशिकच्या प्रवेशद्वाराजवळ आला असून मोर्चेकरी आज नाशिक शहरात येण्यासाठी निघाले आहेत. सर्व मोर्चेकरी पंचवटी मालेगाव स्टॅन्ड कारंजा मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावरती आज दुपारी सर्वसाधारण तीन वाजेच्या दरम्यान हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडक देणार आहे या ठिकाणी जोपर्यंत मागण्या मागण्या होत नाही तोपर्यंत मोर्चेकरी मुक्काम ठोकणार आहे.

दरम्यान, त्यामुळे नाशिक शहरातील वाहतुकीची मोठ्या प्रमाणावर कोंडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी मेहेर सिग्नल ते सीबीएस यादरम्यान दुहेरी वाहतूक करण्याचा निर्णय घेतला असला तरी देखील पोलीस आयुक्त संदीप करणे उपयुक्त चंद्रकांत खांडवी ,किरण चव्हाण व इतर अधिकारी आणि कर्मचारी या मोर्चामुळे नाशिक शहरातील नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून विशेष प्रयत्न करीत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com