one died in car truck accident at yeola kopargaon road near nashik
one died in car truck accident at yeola kopargaon road near nashiksaam tv

Nashik Accident News : येवला-कोपरगाव मार्गावर ट्रक-कारचा भीषण अपघात, एक ठार

या घटनेनंतर दाेन्ही वाहनं रस्त्याच्या कडेला लावण्यात आली आहेत. त्यामुळे या परिसरातील वाहतुक सुरळीत सुरु आहे.
Published on

- अजय सोनवणे

Nashik News :

नाशिक जिल्ह्यातील येवला-कोपरगाव मार्गावर (yeola kopargaon road) मध्यरात्रीच्या सुमारास ट्रक व कार यांच्यात जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात कारचा चुराडा झाला. या अपघातात कार चालक ठार झाला आहे. याबाबची माहिती पाेलिसांनी दिली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार हा अपघात मध्यरात्रीच्या सुमारास म्हसोबा माथा येथे झाला. या अपघातामधील कारचा पुढच्या भागाचे पूर्णत: नुकसान झाले आहे. ट्रकचे देखील पुढच्या भागाचे नुकसान झाले आहे.

one died in car truck accident at yeola kopargaon road near nashik
Lok Sabha Election 2024 : नारायण राणे राजन साळवींचे चॅलेंज स्विकारतील ? (पाहा व्हिडिओ)

या घटनेनंतर दाेन्ही वाहनं रस्त्याच्या कडेला लावण्यात आली आहेत. त्यामुळे या परिसरातील वाहतुक सुरळीत सुरु आहे. या अपघातात कार चालकाचा मृत्यू झाला आहे. पाेलिस घटनेचा तपास करीत आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

one died in car truck accident at yeola kopargaon road near nashik
Pune Accident News : नवले पुलाजवळ विचित्र अपघात, 9 वाहनं एकमेकांवर आदळली; जाणून घ्या महामार्गावरील वाहतूकीची स्थिती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com