Pune Accident News : नवले पुलाजवळ विचित्र अपघात, 9 वाहनं एकमेकांवर आदळली; जाणून घ्या महामार्गावरील वाहतूकीची स्थिती

Navale Bridge Accident : कात्रजकडून (देहू रस्ता) नवले पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर नवले पुलाच्या सिग्नलच्या अगोदर हा विचित्र अपघात घडला.
nine vehicles collided at navale bridge near pune
nine vehicles collided at navale bridge near punesaam tv

- सचिन जाधव

Pune News :

पुण्यातील नवले पुलाजवळ (Navale Bridge) आज (शनिवार) सकाळच्या सुमारास विचित्र अपघात (Accident) झाला. सुमारे आठ ते नऊ वाहनांची धडक झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतुक विस्कळीत झाली. या अपघाताची पाेलिस चाैकशी करीत आहेत. (Maharashtra News)

या अपघाताबाबत मिळालेली माहिती अशी : ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पाठीमागून वाहनांना धडक दिल्याने अपघात घडला आहे. या अपघातात आठ ते नऊ वाहने एकमेकांना धडकली. या अपघातात काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

nine vehicles collided at navale bridge near pune
Pune Metro : पुणे मेट्रोतून प्रवास करणा-यांसाठी महत्वाची बातमी, शुक्रवारपासून 'ही' सुविधा हाेणार बंद, नेटीझन्सच्या संमिश्र प्रतिक्रिया

या अपघातामधील सर्व वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. कात्रजकडून (देहू रस्ता) नवले पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर नवले पुलाच्या सिग्नलच्या अगोदर हा विचित्र अपघात घडला. या घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता वाहतूक विभागाचे अंमलदार व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी वाहनांच्या रांगा लागल्या हाेत्या. पाेलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला केली. तसेच जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. सध्या महामार्गावरील वाहतुक धिम्या गतीने सुरु आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

nine vehicles collided at navale bridge near pune
Maval Taluka Kharedi Vikri Sangh Election : मावळ तालुका खरेदी विक्री संघ निवडणूकीत आम्ही बाजी मारु, काॅंग्रेसचा दावा; महायुतीच्या दहा जागा बिनविरोध

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com