Round vs Long Red Chilli: लांब लाल मिरची की गोल लाल मिरची? कोणती असते जास्त तिखट, खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या फरक!

Round vs Long Red Chilli: गोल लाल मिरची आणि लांब लाल मिरची यांच्यात काय फरक आहे? काश्मिरी, गुंटूर, ब्याडगी आणि चेरी मिरचीचा तिखटपणा, चव आणि स्वयंपाकातील उपयोग जाणून घ्या.
Round vs Long Red Chilli
Round vs Long Red ChilliSaam TV
Published On: 

Round vs Long Red Chilli: स्वयंपाकात लाल मिरचीला विशेष महत्त्व आहे. वरण, आमटी, भाजी किंवा डाळीला लाल मिरचीची फोडणी दिली की पदार्थाची चव आणखी वाढते. बाजारात वेगवेगळ्या आकारांच्या आणि रंगांच्या लाल मिरच्या पाहायला मिळतात. त्यामध्ये लांब लाल मिरची आणि गोल लाल मिरची या दोन प्रकारांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. मात्र, या दोन्ही मिरच्यांच्या चवीमध्ये आणि तिखटपणामध्ये मोठा फरक असतो. काही मिरच्या पदार्थाला सुंदर लाल रंग देतात, तर काही पदार्थाची तिखट चव वाढवतात. मग फोडणीसाठी कोणती मिरची वापरावी? गोल लाल मिरची जास्त तिखट असते की लांब लाल मिरची? जाणून घेऊया.

लांब लाल मिरचीचा वापर कशासाठी होतो?

काश्मिरी लाल मिरची- लांब आणि वाळलेल्या लाल मिरच्यांचा वापर स्वयंपाकात मोठ्या प्रमाणात केला जातो. विशेषतः काश्मिरी लाल मिरची पदार्थांना आकर्षक लाल रंग देण्यासाठी वापरली जाते. या मिरचीचा तिखटपणा तुलनेने कमी असतो. तसेच तिच्यामध्ये स्मोकी चव असते. त्यामुळे फोडणी, ग्रेव्ही आणि चटणीसाठी ही मिरची उत्तम मानली जाते. गुंटूर लाल मिरची असते जास्त तिखट - आंध्र प्रदेशातील गुंटूर मिरची तिच्या तिखटपणासाठी प्रसिद्ध आहे. ही मिरची लांब, लाल आणि तिखट असते. दक्षिण भारतीय पदार्थांमध्ये तसेच मसाले तयार करण्यासाठी तिचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. ब्याडगी मिरची देते गडद लाल रंग- कर्नाटकातील ब्याडगी मिरची दिसायला लांब आणि सुरकुत्या असलेली असते. या मिरचीचा रंग गडद लाल असतो. पदार्थांना आकर्षक रंग आणि विशेष चव देण्यासाठी तिचा वापर केला जातो. चटणी आणि मसाल्यांमध्येही ही मिरची वापरली जाते.

Round vs Long Red Chilli
Dev Diwali Trip: देव दिवाळीला वाराणसीला जाण्याचा प्लॅन करताय? ३ दिवसांत पाहा काशीचे सुंदर घाट, गंगा आरती; असे करा ट्रिपचे नियोजन

गोल लाल मिरचीची चव असते सौम्य

गोल लाल मिरच्यांना चेरी चिली (Cherry Chillies) असेही म्हणतात. या आकाराने लहान, गोलसर आणि गडद लाल रंगाच्या असतात. सामान्यतः या मिरच्या सौम्य तिखटपणासाठी ओळखल्या जातात. फोडणी, सँडविच आणि लोणचे तयार करण्यासाठी त्यांचा वापर केला जातो. गोल लाल मिरची दिसायला पिमेंटो मिरचीसारखी असल्यामुळे अनेकदा दोन्हींची गल्लत होते. मात्र, त्यांचे प्रकार आणि चवीची वैशिष्ट्ये वेगवेगळी असू शकतात. त्यामुळे बाजारातून मिरची खरेदी करताना तिचा प्रकार ओळखणे महत्त्वाचे आहे.

Round vs Long Red Chilli
Samantha Ruth Prabhu: समांथा रुथ प्रभू वयाच्या ३९ व्या वर्षी झाली आई; अभिनेत्रीच्या घरी गोंडस मुलाचे आगमन

भूत जोलोकिया आहे जगातील अत्यंत तिखट मिरच्यांपैकी एक

आसाम, नागालँड, मणिपूर आणि अरुणाचल प्रदेश या ईशान्येकडील राज्यांमध्ये भूत जोलोकिया (Bhut Jolokia) ही मिरची आढळते. तिला घोस्ट पेपर असेही म्हणतात. आकाराने लहान असली तरी तिचा तिखटपणा अत्यंत तीव्र असतो. २००७ मध्ये या मिरचीने जगातील सर्वात तिखट मिरची म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळवले होते.

फोडणीसाठी कोणती मिरची वापरावी?

तुम्हाला पदार्थाला आकर्षक लाल रंग द्यायचा असेल, तर काश्मिरी किंवा ब्याडगी मिरची वापरू शकता. अधिक तिखट चव हवी असल्यास गुंटूर मिरची योग्य ठरते. तर सौम्य तिखटपणासाठी चेरी मिरची वापरता येते. त्यामुळे पदार्थाची चव आणि आवडीनुसार मिरचीची निवड करणे महत्त्वाचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.