Samantha Ruth Prabhu: समांथा रुथ प्रभू वयाच्या ३९ व्या वर्षी झाली आई; अभिनेत्रीच्या घरी गोंडस मुलाचे आगमन

Samantha Ruth Prabhu Baby Boy: अभिनेत्री समंथा रुथ प्रभू वयाच्या ३९ व्या वर्षी आई झाली आहे. राज निदिमोरूसोबत मुलाची पहिली झलक शेअर करत तिने मुलाचे नाव जाहीर केले आहे.
Samantha Ruth Prabhu Baby Boy
Samantha Ruth Prabhu Baby BoySaam Tv
Published On: 

Samantha Ruth Prabhu Baby Boy: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आणि 'द फॅमिली मॅन' फेम समंथा रुथ प्रभूच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. अभिनेत्री समंथा वयाच्या ३९ व्या वर्षी आई झाली आहे. १९ नोव्हेंबर २०२६ रोजी समंथा आणि तिचे पती राज निदिमोरू यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले. या कपलने सोशल मीडियावर आपल्या बाळाची पहिली झलक शेअर करत चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. विशेष म्हणजे, त्यांनी आपल्या मुलाचे नावही जाहीर केले आहे.

समंथा आणि राज यांनी मुलाचे नाव काय ?

समंथा रुथ प्रभूने सोशल मीडियावर एक अतिशय सुंदर फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये समंथा आणि राज निदिमोरू आपल्या बाळाचे छोटेसे बोटे हातात धरताना दिसत आहेत. या कपलने आपल्या मुलाचे नाव 'देव निदिमोरू' (Dev Nidimoru) असे ठेवले आहे. हा खास फोटो शेअर करत त्यांनी लिहिले, "आमचा लाडका मुलगा, देव निदिमोरू. १९.११.२०२६. आज आमचे हृदय आनंदाने पूर्ण भरलेले आहे." त्यांच्या या पोस्टनंतर चाहत्यांसह मनोरंजनविश्वातील अनेक कलाकारांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Samantha Ruth Prabhu Baby Boy
Keerthy Suresh: पत्रकार परिषदेत दिग्दर्शकाने चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला? व्हायरल VIDEO नंतर अभिनेत्रीनं ट्रोलर्सना खडसावलं

समंथाने कधी केली होती गरोदरपणाची घोषणा?

समंथाने २४ जून रोजी आपल्या प्रेग्नंसीची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. तिच्या 'मा इंटि बंगारम' (Maa Inti Bangaram) या तेलुगू चित्रपटाच्या कार्यक्रमादरम्यान तिने ही बातमी चाहत्यांना दिली होती. या ॲक्शन चित्रपटातील गाण्याचे शूटिंग सुरू असताना गरोदर असल्याचे समजल्याचेही तिने सांगितले होते.यानंतर सप्टेंबर महिन्यात समंथाने तिच्या बेबी शॉवरचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या सोहळ्यात तिने भारतीय परंपराने हा सोहळा साजरा केला. समंथा आणि राज यांनी कुटुंबीयांसोबत लिंग भैरवी मंदिरात दर्शन घेतले होते.

Samantha Ruth Prabhu Baby Boy
Sharad Kapoor: प्रसिद्ध अभिनेत्याची वाईट अवस्था; उपचार सुरू, आठवडाभर बेड रेस्टवर, फोनही राहणार बंद

अशी सुरू झाली समंथा आणि राज यांची प्रेमकहाणी

समंथा आणि राज निदिमोरू यांची पहिली भेट 'द फॅमिली मॅन' या वेब सीरिजच्या सेटवर झाली होती. त्यानंतर दोघांनी 'सिटाडेल: हनी बनी' या सीरिजमध्येही एकत्र काम केले. सुरुवातीला दोघांच्या नात्याबद्दल अनेक चर्चा सुरू होत्या. मात्र, दोघांनीही अधिकृतपणे काहीही सांगितले नव्हते. १ डिसेंबर २०२५ रोजी या कपलने लग्नाचे फोटो शेअर करत चाहत्यांना सरप्राईज दिले. त्यांनी योगपरंपरेतील 'भूत शुद्धी विवाह' पद्धतीने लग्न केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.