Sharad Kapoor: प्रसिद्ध अभिनेत्याची वाईट अवस्था; गंभीर उपचार सुरू, आठवडाभर बेड रेस्टवर, फोनही राहणार बंद

Sharad Kapoor: बॉलिवूड अभिनेता शरद कपूर यांच्या प्रकृतीबाबत हेमा चौधरी यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. डॉक्टरांनी त्यांना बेड रेस्टचा सल्ला दिला असून आठवडाभर फोन बंद राहणार आहे.
Sharad Kapoor
Sharad KapoorSaam Tv
Published On: 

Sharad Kapoor: बॉलिवूड अभिनेता शरद कपूर सध्या त्याच्या प्रकृती आणि आर्थिक अडचणींमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्याने चित्रपटसृष्टीतील आपल्या सहकाऱ्यांकडे काम आणि आर्थिक मदतीची विनंती केली होती. त्यानंतर त्याच्या आरोग्याबाबतही चिंता व्यक्त केली जात होती. आता शरद कपूर यांच्या प्रकृतीबाबत त्यांची जवळची मैत्रीण आणि प्राणी कल्याण कार्यकर्त्या हेमा चौधरी यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. शरद यांच्यावर उपचार सुरू झाले असून डॉक्टरांनी त्यांना पूर्णपणे बेड रेस्ट करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच पुढील काही दिवस त्यांना फोनपासूनही दूर ठेवण्यात येणार आहे.

शरद कपूर यांच्या वैद्यकीय चाचण्या सुरू

हेमा चौधरी यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत शरद कपूर यांच्या प्रकृतीची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, अभिनेत्याच्या रक्त तपासण्या सुरू करण्यात आल्या आहेत. काही टेस्टचे रिपोर्ट आले असून बाकी रिपोर्ट पुढील एक-दोन दिवसांत मिळण्याची अपेक्षा आहे. सर्व रिपोर्ट तपासल्यानंतर डॉक्टर पुढील उपचारांबाबत निर्णय घेणार आहेत. सध्या शरद यांच्यावर उपचार सुरू असून त्यांना पूर्ण विश्रांती घेण्यास सांगण्यात आले आहे. कोणताही मानसिक ताण घेऊ नये किंवा शारीरिक श्रम करू नयेत, असा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे.

Sharad Kapoor
Bigg Boss 20: कॅप्टन होताच उदिती सिंहला मिळाली मोठी पॉवर; एका स्पर्धकाला मिळणार नॉमिनेशनपासून सुटका

एका आठवड्यासाठी फोन राहणार बंद

शरद कपूर यांच्या प्रकृतीबाबत हेमा यांनी आणखी एक महत्त्वाची माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून अभिनेता सतत मीडिया, चाहते आणि चित्रपटसृष्टीतील लोकांचे फोन कॉल घेत होता. अचानक वाढलेला हा संपर्क आणि प्रसिद्धी यामुळे ते काहीसे अस्वस्थ झाले होते. शरद गेल्या दोन वर्षांपासून एकांतात राहत होते. त्यामुळे अचानक इतक्या लोकांनी संपर्क साधणे त्यांच्यासाठी कठीण आहे. परिणामी, सध्या त्यांचा फोन बंद ठेवण्यात आला असून तो हेमा यांच्याकडे आहे. डॉक्टरांनी किमान एक आठवडा फोन कॉल न घेण्याचा सल्ला दिला आहे.

Sharad Kapoor
Keerthy Suresh: पत्रकार परिषदेत दिग्दर्शकाने चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला, VIDEO व्हायरल झाल्यानंतर अभिनेत्रीनं सांगितलं सत्य

सोनू निगमच्या व्हॉइस मेसेजने चेहऱ्यावर उमटले हास्य

हेमा यांनी पुढे सांगितले की, शरद सध्या व्यवस्थित जेवत असून त्यांची मनस्थितीही चांगली आहे. अनेक चाहते आणि कलाकार त्यांच्यासाठी शुभेच्छा पाठवत आहेत. विशेष म्हणजे, प्रसिद्ध गायक सोनू निगम यांनी शरद कपूर यांच्यासाठी व्हॉइस मेसेज पाठवला होता. हा मेसेज ऐकल्यानंतर शरद यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.