Bigg Boss 20: कॅप्टन होताच उदिती सिंहला मिळाली मोठी पॉवर; एका स्पर्धकाला मिळणार नॉमिनेशनपासून सुटका

Bigg Boss 20: बिग बॉस २० मध्ये उदिती सिंग पुन्हा कॅप्टन झाली आहे. तिला नॉमिनेशनमधून एका स्पर्धकाला वाचवण्याचा अधिकार मिळाला असून आवडत्या आणि नावडत्या स्पर्धकामध्ये इम्युनिटी चॅलेंज रंगणार आहे.
Bigg Boss 20
Bigg Boss 20Saam Tv
Published On: 

Bigg Boss 20: 'बिग बॉस २०' च्या घरात सध्या नवनवीन ट्विस्ट आणि घडामोडींना वेग आला आहे. नुकताच पार पडलेला 'वीकेंड का वार' चांगलाच चर्चेत राहिला. या भागात सलमान खानने घरातील सदस्यांची चांगलीच शाळा घेतली. काही स्पर्धकांना त्यांच्या चुका दाखवून देत सलमानने आगामी आठवड्यांमध्ये कसे खेळाल या बद्दल सल्लाही दिला. दरम्यान, घरातील वाद, कॅप्टन्सी टास्क आणि नॉमिनेशनमुळे बिग बॉसच्या घरात पुन्हा एकदा रंगत वाढली आहे.

स्काउट आणि लव्ह गिल यांच्यातील वाद संपला

गेल्या काही दिवसांपासून स्काउट ओपी आणि लव्ह गिल यांच्यातील वाद चर्चेचा विषय ठरला होता. मात्र, आता दोघांमधील वातावरण शांत झाल्याचे पाहायला मिळत आहे. लव्ह गिलने घरातील इतर सदस्यांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली. स्काउट ओपीसोबत आता आपला कोणताही संबंध नसल्याचे तिने सांगितले. त्यामुळे या दोघांच्या नात्यात पुढे काय घडणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

Bigg Boss 20
Actor Death: प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन; यकृताच्या आजाराशी झुंज ठरली अपयशी, सावत्र भावाने सांगितली दुःखद बातमी

उदिती सिंग पुन्हा बनली घराची कॅप्टन

दुसरीकडे, बिग बॉसच्या घरात नव्या कॅप्टनच्या निवडीसाठी चुरशीची स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत उदिती सिंगने बाजी मारत पुन्हा एकदा घराच्या कॅप्टनपदावर आपले नाव कोरले. विशेष म्हणजे, कॅप्टन झाल्यानंतर तिला बिग बॉसकडून एक महत्त्वाचा अधिकारही देण्यात आला आहे. या अधिकारामुळे घरातील नॉमिनेशनमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे.

आवडता आणि नावडता सदस्य निवडण्याची जबाबदारी

'बिग बॉस २०' च्या नव्या प्रोमोमध्ये एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. या आठवड्यातील नॉमिनेशनमधून एका स्पर्धकाला सुरक्षित करण्याची संधी उदिती सिंगला मिळणार आहे. यासाठी तिला घरातील आपला सर्वात आवडता आणि सर्वात न आवडणारा सदस्य निवडण्यास सांगितले जाते. अनेकांच्या मते, आरिशफा खान ही उदितीची आवडती स्पर्धक असू शकते. मात्र, तिने सर्वात न आवडणारा सदस्य म्हणून कोणाची निवड केली आहे, याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.

Bigg Boss 20
Bigg Boss 20 : काझी तौकीरच्या एका कमेंटने मनीष गोयलचा संताप अनावर; घरात केला गोंधळ, नंतर ढसाढसा रडला

इम्युनिटी चॅलेंजमध्ये कोण मारणार बाजी?

या टास्कमध्ये ट्विस्ट म्हणजे, बिग बॉस या दोन्ही सदस्यांमध्ये इम्युनिटी चॅलेंज होणार असल्याचे सांगतात. या स्पर्धेत जो स्पर्धक जिंकेल त्याला थेट नॉमिनेशनमधून सुरक्षित होण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे उदितीची निवड कोणासाठी फायदेशीर ठरणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या आठवड्यात कनिका मान, लव्ह गिल, माही विज, गुल्लू, आम्रपाली दुबे, काझी तौकीर, आरिशफा खान, मनीष गोयल, यंग डीएसए आणि स्काउट हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. आता या दहा स्पर्धकांपैकी कोणाला इम्युनिटी मिळणार आणि कोणाचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपणार, याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.