प्राणीप्रेमींसाठी खास पर्वणी! पुण्यात 'सकाळ पेटोपिया २०२६' महोत्सवाला सुरुवात; शहामृग अन् मकाऊ पोपट ठरतायत मुख्य आकर्षण

Sakal Petopia: पुण्यात सकाळ माध्यम समूहा’तर्फे सकाळ पेटोपिया महोत्सव आयोजित करण्यात आले आहे. शहामृग, मकाऊ पोपट, अश्व, श्वान पथकाची प्रात्यक्षिके आणि अश्वरोहण स्पर्धा पाहण्याची संधी प्राणीप्रेमींना मिळणार आहे.
Sakal Petopia
Sakal PetopiaSaam TV
Published On: 

Sakal Petopia: पुण्यातील प्राणीप्रेमी आणि पाळीव प्राण्यांच्या पालकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पाळीव प्राण्यांसोबतचे नाते, त्यांच्याविषयीचे प्रेमासाठी 'सकाळ माध्यम समूहा’तर्फे 'सकाळ पेटोपिया' या तीन दिवसीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. २०, २१ आणि २२ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत हा महोत्सव पार पडणार आहे. पुणेकरांना आपल्या लाडक्या पाळीव प्राण्यांसह या महोत्सवात सहभागी होता येणार आहे. विशेष म्हणजे, येथे केवळ श्वान आणि मांजरीच नव्हे, तर शहामृग, अश्व आणि रंगीबेरंगी मकाऊ पोपटांसह विविध प्राणी-पक्षी पाहण्याची संधी मिळणाप आहे.

सकाळ माध्यम समूहा तर्फे आयोजित करण्यात आलेल्या या 'सकाळ पेटोपिया' महोत्सवात प्राणीविश्वातील विविधतेचा जवळून अनुभवता येणार आहे. त्यामुळे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी हा महोत्सव मनोरंजनासोबतच माहितीपूर्ण अनुभव ठरु शकतो.

Sakal Petopia
Dev Diwali Trip: देव दिवाळीला वाराणसीला जाण्याचा प्लॅन करताय? ३ दिवसांत पाहा काशीचे सुंदर घाट, गंगा आरती; असे करा ट्रिपचे नियोजन

अश्वरोहण स्पर्धा आणि श्वान पथकाचे प्रात्यक्षिक

या महोत्सवाचे आणखी एक मोठे आकर्षण म्हणजे अश्वरोहण स्पर्धा. घोडेस्वारीची आवड असणाऱ्यांना या स्पर्धेचा अनुभव घेता येणार आहे. त्याचबरोबर पोलिस दलातील श्वान पथकाकडून विशेष प्रात्यक्षिके सादर केली जाणार आहेत. प्रशिक्षित श्वान आपल्या कौशल्यांचे प्रदर्शन करताना पाहण्याची संधी यानिमित्ताने पुणेकरांना मिळणार आहे.

Sakal Petopia
Samantha Ruth Prabhu: समांथा रुथ प्रभू वयाच्या ३९ व्या वर्षी झाली आई; अभिनेत्रीच्या घरी गोंडस मुलाचे आगमन

कधी आणि कुठे होणार सकाळ पेटोपिया

'सकाळ पेटोपिया' महोत्सवाचे आयोजन पुण्यातील कोथरूड येथील सूर्यकांत काकडे फार्म्स येथे करण्यात आले आहे. २० ते २२ नोव्हेंबर २०२६ या तीन दिवसांत सकाळी १० ते दुपारी २:३० ते संध्याकाळी ४:३० ते रात्री ८:३० यावेळेत नागरिकांना या महोत्सवाला भेट देता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.