Asha Workers Strike: 'आश्वासन नको, मानधनवाढीचा जीआर काढा'; ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आशा सेविकांचं ठिय्या आंदोलन

Asha Workers Strike In Thane: आरोग्य विभागातील आशा सेविकांनी १२ जानेवारीपासून बेमुदत संप पुकारला आहे. वेगवेगळ्या मागण्यांसाठी आशा सेविका आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय.
Asha Workers Strike
Asha Workers Strike Saam Thane
Published On

Asha Workers Strike Demands

आपल्या विविध मागण्यांसाठी आशा सेविकांनी (Asha Workers) 'ठाण्यातील कोर्ट नाका' या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. राज्यातील हजारो आशा वर्कर्स या ठिकाणी दाखल झाल्या आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये समायोजन करावे, ऑनलाइन कामं बंद करावीत या मागण्यांसाठी त्या मोठ्या संख्येने ठाण्यात दाखल झाल्या आहेत. (Latest Marathi News)

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या

'आश्वासन नको, मानधनवाढीचा जीआर काढा', या मागणीसाठी आशा गटप्रवर्तक आक्रमक झालेल्या पाहायला मिळत आहे. मानधन वाढीचा जीआर जोपर्यंत काढत नाही, तोपर्यंत ठाणे (Thane) जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या मांडून बसण्याचा निर्णय या गटप्रवर्तक आशा सेविकांनी घेतला (Asha Workers Strike In Thane) आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आशा सेविकांचा बेमुदत संप

आपल्या मागण्या मान्य करुन घेण्यासाठी हजारोंच्या संख्येने आशा स्वयंसेविका ७ तारखेला शहापूरवरुन पायी चालत निघाल्या होत्या. हा लॉंग मार्च काल (९ फेब्रुवारी) ठाण्यात पोहोचला आहे. आरोग्य विभागातील आशा सेविकांनी १२ जानेवारीपासून बेमुदत संप (Asha Workers Strike) पुकारलेला आहे.

मुख्यमंत्र्यांचं आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी काल मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी या आशा सेविकांनी मुख्यमंत्र्यांचं अभिष्टचिंतन केलं होतं. तरीही मुख्यमंत्र्यांकडून फक्त आश्वासनच मिळाल्याने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय (Asha Workers Strike Demands) आता आशा सेविकांनी घेतला आहे.

Asha Workers Strike
Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation : संभाजीनगर महापालिकेच्या 31 कर्मचा-यांवर संक्रांत, एक दिवसाचा पगार कापला जाणार

आशा सेविकांचा लॉंग मार्च

आरोग्य विभागात आशा सेविकांचा राज्यव्यापी बेमुदत संप १२ जानेवारीपासून सुरूच आहे. आरोग्यमंत्री, प्रधान सचिव यांनी दिवाळी बोनस व मानधनवाढ तीन महिन्यापूर्वी जाहीर केली (Asha Workers Demands) होती. परंतु, त्याबाबतचे कोणतेही आदेश शासन प्रशासनाने काढलेले नाही. त्यामुळे आशा, गटप्रवर्तक राज्यभर आंदोलन करत आहेत.

अजून सरकारने या आंदोलनाची दखल घेतलेली नाही. शासनाचं लक्ष वेधण्यासाठी, मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आशा सेविका शुक्रवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्या (Asha Workers In Thane) आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य आशा गट प्रवर्तक कृती समितीने बुधवारी शहापूरपासून लाँग मार्च काढला आहे. शुक्रवारी हा मोर्चा ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला आहे.

Asha Workers Strike
Asha Sevika Strike: मोठी बातमी! संभाजीनगरमधील 440 आशा स्वयंसेविकांचं तडकाफडकी निलंबन; प्रशासनाचा खळबळजनक निर्णय

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com