Asha Sevika Morcha : ऑनलाईन कामाची सक्ती अमान्य, अकाेला जिल्हाधिकारी कार्यालयावर आशा सेविकांचा माेर्चा

Asha Workers Morcha In Akola : अकोला शहरातील अशोक वाटिकापासून काढण्यात आलेला हा माेर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला.
asha sevika morcha at akola collector office
asha sevika morcha at akola collector officesaam tv
Published On

- अक्षय गवळी

Akola News :

विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी आज आशा सेविकांनी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर माेर्चा काढला. गेले 26 दिवस झाले आशा सेविका राज्यव्यापी संपावर गेल्या आहेत. सरकारने मागण्यांकडे लक्ष द्यावे यासाठी आशा सेविका (asha sevika morcha) घाेषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्या. (Maharashtra News)

आशा सेविकांना दिवाळी पूर्वी रुपये २ हजार रूपये बोनस द्या, पगारात रुपये ७ हजार प्रतिमाहची वाढ करावी तसेच आशा वर्कर्सला ऑनलाईन कामाची सक्ती करु नये आदी मागण्यांसाठी आजचा माेर्चा हाेता.

asha sevika morcha at akola collector office
Valentine Day निमित्त मावळातून तीस लाख गुलाब जाणार आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत, शेतकऱ्यांची लगबग सुरू

अकोला शहरातील अशोक वाटिकापासून काढण्यात आलेला हा माेर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला. या मोर्चात सुमारे 500 वर आशा सेविका सहभागी झाल्या होत्या. सरकराने आशा सेविकांच्या मागण्या मान्य न केल्यास आगामी काळात तीव्र आंदाेलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

asha sevika morcha at akola collector office
Kolhapur : वस्ताद बाळ गायकवाड यांचे निधन, मल्ल हळहळले

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com