- Ramu Dhakne
महापालिकेच्या कामात हलगर्जीपणा केल्याने छत्रपती संभाजीनगर महापालिका (Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation) प्रशासक जी. श्रीकांत यांनी तब्बल 31 कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार कापण्याचा आदेश केलेत. यामुळे कर्मचा-यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. (Maharashtra News)
महापालिका कार्यालयात जी. श्रीकांत यांनी नुकतीच एक आढावा बैठक घेतली. त्यात काही वार्ड कार्यालयामध्ये वसुली कर्मचाऱ्यांनी एक रुपयाची ही वसुली न केल्याचे समोर आले. यामध्ये तब्बल 31 कर्मचारी आढळले.
यामुळे महापालिका प्रशासक जी. श्रीकांत यांनी कर्मचाऱ्यांच्या पगारातून 1 हजार रुपये आणि कंत्राटी असेल तर एक दिवसाचा पगार कापण्याचे आदेश दिले. त्याबरोबरच वसुलीसाठी स्वतंत्र टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती उपयुक्त अपूर्ण थेटे यांनी दिली.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.