- हर्षदा सोनोने
अकाेला शहरातील युवा वर्ग सुरक्षित राहिला पाहिजे. काेणावरही अन्याय झाला नाही पाहिजे. शहरातील कायदा व सुवव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे यासाठी आजचा माेर्चा आहे. पाेलिसांनी गुन्हेगारांवर वचक ठेवावा अशी मागणी उद्धव ठाकरे गटाचे (uddhav thackeray faction) बाळापुरचे आमदार नितीन देशमुख (mla nitin deshmukh) यांनी अकाेला येेथे केली. (Maharashtra News)
अकोला येथील कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याचा दावा करीत आज (मंगळवार) उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी (shiv sena (UBT) अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला. या माेर्चात शिवसैनिकांसह माेठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले हाेते.
यावेळी विद्यार्थी आणि विद्यार्थ्यींनी यांनी 'नीट अभ्यासक्रमा'साठी शिकायला आलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील विशाल झालटे याच्या हत्येची सखाेल चाैकशी व्हावी अशी मागणी केली. तसेच या प्रकरणी वकील उज्जवल निकम यांची नियुक्ती केली जावी अशी मागणी करण्यात आली.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.