राजस्थानमधील पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून भरतपूरमध्ये काँग्रेसने मोठे यश मिळवले आहे. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या जिल्ह्यातच भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे. भरतपूर जिल्हा परिषदेच्या 31 पैकी तब्बल 21 जागांवर काँग्रेसने विजय मिळवत स्पष्ट बहुमताकडे वाटचाल केली आहे. तर भाजपला फक्त 9 जागांवर समाधान मानावे लागले आहे. एका जागेवर आरएलपीच्या उमेदवाराने बाजी मारली आहे.
काँग्रेस - 21 जागांवर विजय
भाजप - 9 जागांवर विजय
आरएलपी - 1 जागेवर विजय
काँग्रेसच्या राजेश, अरविंद, चेतन, हरिसिंह, हरबीर सिंह, हीराचंद, सावित्री देवी, अशोक, सपना, प्रमोद, रानुवाला, सरोज, हरप्यारी, अंजू कुमारी, सुमन गुर्जर, रेखा कुमारी, ओमवती आणि बोदन सिंह यांच्यासह एकूण 21 उमेदवार विजयी झाले आहेत. दुसरीकडे भाजपच्या संगीता, राधा, सतीवीर, मिथिलेश, पूजा कुमारी, मीरा देवी, मानसिंह, दिनेश भातरा आणि रघुवीर सिंह यांनी विजय मिळवला. तर प्रभाग क्रमांक 26 मधून आरएलपीच्या रेनू कुमारी यांनी बाजी मारली.
मागील जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने 17 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला होता. काँग्रेसला 14 जागांवर विजय मिळाला होता. तर अपक्षांनी 4 आणि बसपाने 2 जागा जिंकल्या होत्या. मात्र, यंदाच्या निवडणुकीत चित्र पूर्णपणे बदललं असून काँग्रेसने भाजपला मोठा धक्का दिला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.