Shirur Leopard  Saam Tv
महाराष्ट्र

Shirur: मुलगा खेळत होता झोका, दबक्या पावलाने बिबट्या आला; हल्ल्यात चिमुकला बचावला; थरकाप उडवणारा VIDEO

Shirur Leopard Attack: पुणे जिल्ह्यातल्या शिरूरमध्ये बिबट्याची दहशत वाढत चालली आहे. बिबट्याने एका चिमुकल्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला. पण तो थोडक्यात बचावला. या हल्ल्याचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

Priya More

Summary -

  • शिरूर तालुक्यातील काळेचीवाडी येथे बिबट्याचा चिमुकल्यावर हल्ल्याचा प्रयत्न

  • बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकला थोडक्यात बचावला

  • चिमुकल्याने प्रसंगावधान राखून घरात धाव घेतल्याने जीव वाचला

  • हल्ल्याचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला असून व्हिडीओ व्हायरल होत आहे

रोहिदास गाडगे, शिरूर

शिरुर तालुक्यातील पिंपरखेड गावात नुकताच १४ वर्षीय रोहन बोंबे या चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच खेड तालुक्यातील काळेचीवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्याचा आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घराच्या अंगणात झोक्यावर खेळणारा एक चिमुकला बिबट्याच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावला. या घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील काळेचीवाडी येथे घराच्या अंगणात चिमुकला झोक्यावर खेळत असताना बिबट्या अचानक कुत्र्याची शिकार करण्यासाठी थेट कंपाऊंडमध्ये घुसला. काही क्षणांतच चिमुकल्याने प्रसंगावधान राखत घरात धाव घेतली. कुटुंबीयांनी आरडाओरड केल्याने बिबट्या घाबरून पळून गेला. बिबट्याच्या या थरारक हालचाली सीसीटीव्हीमध्ये स्पष्टपणे कैद झाल्या आहेत.

या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून स्थानिकांनी वनविभागाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. सध्या शिरूरमध्ये बिबट्याची दहशत वाढली आहे. बिबट्याकडून वारंवार नागरिकांवर हल्ले केले जात आहे. आतापर्यंत अनेकांचा जीव घेतला आहे. त्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. बिबट्यांचा बंदोबस्त करा किंवा त्यांना मारून टाका अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.

दरम्यान, शिरुर तालुक्यात आणखी एक बिबट्या जेरबंद झाला असून एका बिबट्याचा खात्मा करण्यात आला आहे. तर दोन बिबटे जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे. संतप्त ग्रामस्थ आक्रमक झाल्यानंतर वन विभागाकडून या मोहिमेला वेग आला आहे. वनविभागाने ३० पिंजऱ्यांचे जाळे ठेवले, त्यातील पिंपरखेडमध्ये दुसरा बिबट्या जेरबंद झाला. १३ वर्षीय रोहन बोंबे ठार झाल्यानंतर त्याच गावात वनविभागाने ही मोहीम राबवलेली आहे. शिरूरसह जुन्नर, आंबेगाव आणि खेड या ४ तालुक्यातील बिबटे गुजरातच्या वनतारा आणि विविध जिल्ह्यातील वनक्षेत्रात स्थलांतरित करण्याचा निर्णय झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sidharth Malhotra Father Passes Away: बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यावर कोसळला दु:खाचा डोंगर, सिद्धार्थ मल्होत्राला पितृशोक

Gold Rate Today : सोन्याच्या दरात मोठी पडझड; काय आहे दिवसाअखेरचा दर?

मोठी बातमी! मुस्लीम समाजाचं ५ टक्के आरक्षण रद्द, अचानक नेमकं काय घडलं? VIDEO

रशिया-पाकिस्तानमध्ये 'यारीदोस्ती'; भारताच्या संरक्षण सज्जतेपुढे आव्हान, VIDEO

Gram Panchayat Elections: दिवाळीत उडणार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बार? मतदानाबाबत नवी अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT