Pune : ऊसाच्या शेतात लपलेला नरभक्षक बिबट्या शार्पशूटरकडून ठार, शिरूरमध्ये तिघांचा घेतला होता जीव

leopard shot dead in Pune Shirur operation : पुण्यातील शिरूर तालुक्यात दहशत निर्माण करणाऱ्या नरभक्षक बिबट्याला वनविभागाने ऊसाच्या शेतात गोळ्या घालून ठार केले. दोन लहान मुलांसह तिघांचा बळी घेतल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन केले होते.

Pune Shirur bibtya dead News: पुण्यातील शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावात दहशत निर्माण करणाऱ्या नरभक्षक बिबट्याला अखेर वनविभागाने ठार केले आहे. गेल्या पंधरा ते वीस दिवसांत या बिबट्याने दोन लहान मुलांसह तिघांचा बळी घेतल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड संतापाचे आणि भीतीचे वातावरण होते. 'उत्तर पुणे भागामध्येही बिबट्यांची संख्या बाराशेहून अधिक असल्याचा दावासुद्धा ग्रामस्थांकडून केला जातोय.' या नरभक्षक बिबट्याच्या बंदोबस्तासाठी स्थानिकांनी आंदोलन तीव्र केल्यानंतर, वनविभागाने शार्प शूटर्सच्या मदतीने शोधमोहीम हाती घेतली. अखेर ऊसाच्या शेतात या बिबट्याला गोळ्या घालून ठार करण्यात यश आले. या कारवाईनंतर ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com