Junnar leopard Attack : बिबट- माणसांचा संघर्ष उफाळला, पुण्यात बिबट्यानं घेतला 60 जणांचा बळी; नागरिक म्हणतात गोळ्याच घाला

pune junnar leopard attack : जुन्नर वनपरिक्षेत्रातील बिबट्यांनी तब्बल 60 जणांचा बळी घेतलाय...सरकार मात्र बैठकांचं सत्र आणि घोषणांचा पाऊस पाडण्यात मग्न आहे.. पुणे जिल्ह्यातलं मृत्यूचं तांडव कधी थांबणार? जेरबंद बिबट्याला गोळ्या घालण्यासाठी नागरिक का आक्रमक झाले आहेत? यावरचा हा रिपोर्ट...
pune Leopard
Leopard Attack Saam tv
Published On

रस्त्यावर जळणारे हे टायर, पेटलेली गाडी आणि आगीत बेचिराख झालेलं वनविभागाचं कार्यालय...हा उद्रेक आहे, बिबट- माणसांच्या संघर्षाचा...गावातल्या पायवाटांपासून शेतशिवारापर्यंत बिबट्याची दहशत पसरलीय...पुणे जिल्ह्यात बिबट्यांच्या हल्ल्यात गेल्या 10 वर्षात तब्बल 60 जणांना आपला जीव गमवावा लागलाय...मात्र तरीही राज्यकर्त्यांनी ठोस उपाय न योजल्यामुळे गावकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे..

13 वर्षीय चिमुकल्याच्या मृत्यूनंतर वनविभागानं एका बिबट्याला जेरबंद केलयं...आता हाच बिबट्या नरभक्षक आहे का यावरून संभ्रम निर्माण झालाय. मात्र वनखात्यानं बिबट्याला गोळ्या घालण्याचे आदेश दिले होते....त्यामुळे आता रक्ताला रक्तच हवं अशी भूमिका नागरिकांनी घेतलीय.

pune Leopard
Latur Shocking : पुण्यानंतर लातूरमध्ये रक्तरंजित थरार; शेतात गाढ झोपलेल्या बाप-लेकाची हत्या, मृतदेह पाण्याच्या टाकीजवळ फेकले

जुन्नर वनपरिक्षेत्रातील बिबट्यांनी कशी दहशत निर्माण केलीय.. पाहूयात...

गेल्या 10 वर्षात बिबट्याची संख्या 2 हजारावर पोहचलीय... तर बिबट्यांच्या हल्ल्यात 60 जणांचा मृत्यू झालाय... 400 हून अधिक नागरिक बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेत..14 हजारांहून अधिक पाळीव प्राण्याचा बळी बिबट्यांनी घेतलाय... तर 348 बिबटे जेरबंद झालेले असून 260 बिबट्यांना पुनर्वसनासाठी पाठवण्यात आलयं.

pune Leopard
Road Accident : ४८ तासांत 3 मोठे अपघात, 53 जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी

बिबट्यांमुळे मनुष्यहानी रोखण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने 11 कोटी 25 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय... या निधीतून 20 रेस्क्यू टीम, 500 पिंजरे आणि अत्याधुनिक उपकरणांसह बिबट्यांना जेरबंद करून स्थालंतर आणि नसबंदी करण्यासाठी उपाययोजना केली जाणार आहे.

बिबट्यांच्या हल्ल्यात एखाद्याचा बळी गेला की सरकारकडून बैठकांचं सत्र आणि घोषणांचा पाऊस पाडला जातो... मात्र ठोस उपाययोजना कधीच केली जात नाही... आणि त्यामुळेच आतापर्यंत ६० जणांना आपला जीव गमवावा लागलाय. हे मृत्यूचं तांडव कधी थांबणार याकडे पुणे जिल्ह्यातल्या नागरिकांचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com