Road Accident : ४८ तासांत 3 मोठे अपघात, 53 जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी

Road Accident in India : देशात मागील ४८ तासांत 3 मोठे अपघात झाले. या तिन्ही वेगवेगळ्या अपघातात ५३ जणांचा मृत्यू झाला आहे.
Road Accident update
Road Accident : Saam tv
Published On
Summary

देशात अपघातांची मालिका

तीन वेगवेगळ्या अपघातात ५० हून अधिक जणांचा मृत्यू

रस्ते वाहतुकीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

देशामध्ये गेल्या दोन दिवसांपासून अपघातांची मालिका सुरु आहे. देशांत मागील ४८ तासांत तीन वेगवेगळ्या ठिकाणी भयंकर अपघाताच्या घटना घडल्या. या अपघातात ५० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने पुन्हा रस्ते वाहतुकीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

देशात दोन दिवसांत तेलंगणा, जयपूर आणि राजस्थानमध्ये अपघाताच्या घटना घडल्या. तिन्ही अपघातात एकूण ५० हून अधिक जणांचे बळी गेले. या अपघातात अनेकांनी त्यांच्या जवळच्या लोकांना गमावलं आहे.

Road Accident update
Mumbai : मुंबईत पुन्हा आढळला मतदारयादीत घोळ; एकाच व्यक्तीचे तीन EPIC नंबर, मनसेने पुरावाच दिला

तेलंगणामध्ये २४ जणांचा अपघाती मृत्यू

तेलंगणाच्या मोइनाबाद आणि विकराबादमधील मन्नागुडा येथे रस्ते अपघाताची घटना घडली. बस आणि ट्रकच्या अपघातात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. अपघातानंतर बसमधील अनेकांनी आरडाओरड केली. या दुर्दैवी घटनेत तीन सख्ख्या बहिणीचा देखील मृत्यू झाला.

जयपूरमध्ये अपघातात १८ जण दगावले

जयपूरमध्ये नशेत धुंद असलेल्या डंपर चालकाने अनेक गाड्यांना चिरडलं. डंपर चालकाने अनेक वाहनांना चिरडल्यानंतर एकच हाहाकार झाला. अपघातात अनेक जण डंपरखाली चिरडले गेले. या अपघातात एकूण १८ जणांचा मृत्यू झाला. तर डझनहून अधिक लोक जखमी झाले. अपघातातील जखमींना तातडीने कांवटिया रुग्णालयात दाखल केलं. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

Road Accident update
Mumbai :...तर आम्हीही रस्त्यावर उतरू; मुंबईतील कबूतरखान्यांचा वाद पुन्हा तापणार; मराठी एकीकरण समिती आक्रमक

राजस्थानच्या जोधपूरमध्ये १५ जणांचा अपघाती मृत्यू

राजस्थानमधील जोधपूरच्या फलोदी येथील मतोडा येथे रविवारी रात्री भीषण अपघाताची घटना घडली. या अपघातात एकूण १५ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये १० महिला, ४ लहान मुले आणि चालकाचा समावेश आहे. या अपघाताने परिसरात खळबळ उडाली होती. गेल्या ४८ तासांत ५० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. वाढत्या अपघातामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com