Mumbai news
MumbaiSaam tv

Mumbai : मुंबईत पुन्हा आढळला मतदारयादीत घोळ; एकाच व्यक्तीचे तीन EPIC नंबर, मनसेने पुरावाच दिला

Mumbai Crime News : मुंबईत पुन्हा मतदारयादीचा घोळ सापडला आहे. एकाच व्यक्तीचे तीन EPIC नंबर समोर आलं आहे.
Published on
Summary

चारकोप मतदारसंघात विजय गोहिल या व्यक्तीचे तीन वेगळे EPIC नंबर

मतदारांची तीनही नोंदी एकाच पत्त्यावर

मनसेचे दिनेश साळवी यांनी या प्रकाराची माहिती माध्यमांसमोर

मतदारयादीतील अचूकतेबाबत निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबईच्या चारकोप विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीतील घोळ थांबता थांबत नाही. यादी क्रमांक 87 मध्ये विजय गोहिल या एकाच व्यक्तीचे तीन वेगवेगळ्या EPIC नंबरवर नाव नोंद झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

उल्लेखित EPIC क्रमांक — AVE7141393, AVE7146871, AVE7148091 — हे तिन्ही नंबर एकाच पत्त्यावर, डी विंग 202, सुरभी कॉम्प्लेक्स, येथे नोंदवलेले आहेत. एकाच व्यक्तीचे, एकाच यादीत, एकाच पत्त्यावर तीन वेगळे EPIC नंबर कसे काय नोंदवले गेले, असा गंभीर प्रश्न उपस्थित आहे. या प्रकाराला मनसेचे चारकोप विधानसभा अध्यक्ष दिनेश साळवी यांनी वाचा फोडली आहे.

Mumbai news
Dombivli Crime : खराब नारळ का दिलं? ग्राहकाने जाब विचारल्याने विक्रेता भडकला; चाकू हल्ल्यात ग्राहकाची करंगळी तुटली

या प्रकाराकडे निवडणूक आयोगाचे लक्ष का गेले नाही, याबाबत देखील मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होत आहे. या प्रकारामुळे मतदारयादीतील अचूकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Mumbai news
PM Narendra Modi : आजारातून लवकर बरे व्हा; संजय राऊतांची प्रकृती गंभीर, PM नरेंद्र मोदींकडून खास पोस्ट

काही दिवसांपूर्वी शोधली होती चूक

काही दिवसांपूर्वी मनसेने घोळ शोधला होता. यमुनाबाई गणपत कांबळे नावाच्या महिलेच्या मतदार नोंदीवर बुरखा घातलेल्या मुस्लिम महिलेचा फोटो निरीक्षणात समोर आला होता. त्यावेळी गंभीर विसंगतीमुळे निवडणूक प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. या प्रकारानंतर आता आणखी एक समोर आला आहे.

Q

नेमका घोळ कशाबद्दल आहे?

A

विजय गोहिल या व्यक्तीचे नाव मतदार यादीत तीन वेगवेगळ्या EPIC नंबरवर नोंदले गेले आहे.

Q

मतदारयादीत चूक कोणत्या मतदारयादीत आढळली?

A

मुंबईच्या चारकोप विधानसभा मतदारसंघात हा प्रकार आढळला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com