Dombivli Crime : खराब नारळ का दिलं? ग्राहकाने जाब विचारल्याने विक्रेता भडकला; चाकू हल्ल्यात ग्राहकाची करंगळी तुटली

Dombivli Crime News : खराब नारळ दिल्याने ग्राहकाने विक्रेत्याला जाब विचारला. त्यानंतर भडकलेल्या विक्रेत्याने ग्राहकावर चाकू हल्ला केला.
Dombvli Crime
Dombvli Crime News Saam tv
Published On
Summary

डोंबिवलीत हॉस्पिटलसमोर घडली घटना

किरकोळ वादातून घडला रक्तरंजित थरार

विक्रेत्याचा ग्राहकावर जीवघेणा हल्ला

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

डोंबिवली एमआयडीसी परिसरात एम्स हॉस्पिटलसमोर घडलेल्या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. नारळ विक्रीवरून झालेल्या किरकोळ वादाने रक्तरंजित वळण घेतलं. फेरीवाल्याने ग्राहकावर जीवघेणा हल्ला केला. 24 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

Dombvli Crime
IAS, IPS आणि IRS...; निवडणुकीच्या मैदानात उतरले डॅशिंग निवृत्त अधिकारी, कोण बाजी मारणार?

मिळालेल्या माहितीनुसार, दयानंद महादेव जतन वय 58 वर्षे यांनी एम्स हॉस्पिटलजवळील नारळ विक्रेता सलिम याला सुकलेले, खराब नारळ का विकतोस? असे विचारल्यावर वाद निर्माण झाला. या वादातून संतापलेल्या सलिमने दयानंद यांना धक्काबुक्की करत नारळ कापण्याच्या चाकूने डाव्या हातावर वार केला.

Dombvli Crime
Raj Thackeray Speech : EVM व्होटचोरी डेमो ते १ तारखेचा मोर्चा; राज ठाकरेंच्या भाषणातील 10 ठळक मुद्दे

बचाव करण्याच्या प्रयत्नात जतन यांनी चाकू पकडला. त्यानंतर सलिमने तो हिसकावून घेतल्याने त्यांच्या हाताच्या तीन बोटांना गंभीर दुखापत झाली आणि एक करंगळी पूर्णपणे तुटली. या घटनेनंतर फिर्यादीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या अभिप्रायानुसार ते तात्काळ जबाब देण्याच्या स्थितीत नसल्याने त्यांचा जबाब नंतर नोंदविण्यात आला. त्यानंतर मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांचा तपास सुरू असून आरोपी अद्याप फरार आहे.

सांगलीत मित्रानेच केली मित्राची हत्या

सांगलीत मित्रानेच मित्राचा गळा चिरून हत्या केल्याची घटना घडली आहे. विश्रामबाग परिसरात असलेल्या व्हाईट हाऊस बारमध्ये दारू पिताना झालेल्या वादातून चाकूने गळ्यावर वार करत खून केला. निखिल साबळे असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. सदर हत्याची घटना रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास घडली.

घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक संदीप घुगे, उपअधीक्षक प्रणील गिल्डा यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. खून करणारा संशयित प्रसाद सुतार हा घटनास्थळावरून पसार झाला असून त्याच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. खुनाची घटना परिसरात वाऱ्यासारखी पसरताच बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com