IAS, IPS आणि IRS...; निवडणुकीच्या मैदानात उतरले डॅशिंग निवृत्त अधिकारी, कोण बाजी मारणार?

bihar assembly Election : बिहार विधानसभा निवडणुकीच्या मैदानात डॅशिंग निवृत्त अधिकारी उतरले आहेत. या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.
Bihar news
bihar assembly Election Saam tv
Published On
Summary

बिहार विधानसभा निवडणुकीत माजी आयएएस, आयपीएस आणि आयआरएस अधिकारी

‘सिंघम’ म्हणून प्रसिद्ध असलेले माजी आयपीएस शिवदीप लांडे देखील निवडणुकीच्या मैदानात

भाजपने माजी आयआरएस सुजीत सिंह आणि आयपीएस आनंद मिश्रा यांना दिलं तिकीट

काँग्रेसकडून माजी डीजीपी बी. के. रवि यांना रोसडा मतदारसंघातून उमेदवारी

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये राजकारण तापलं आहे. बिहारमध्ये सर्व राजकीय पक्षांनी त्यांचे उमेदवार जाहीर केले आहेत. दुसरी काही मदारसंघातून निवृत्त सनदी अधिकारी देखील नशीब आजमवणार आहेत. बिहारमध्ये एक डझनहून अधिक माजी आयएएस, आयपीएस आणि आयआरएस अधिकाऱ्यांनी व्हिआरएस घेऊन राजकारणाची वाट धरली आहे. काही जणांनी प्रस्थापित पक्षांकडून तिकिट मिळवलं आहे. तर काहींनी थेट स्वत:च्या पक्षाची स्थापना केली आहे.

माजी पोलीस अधिकारी आणि आमदार सुनील कुमार हे पुन्हा एकदा राजकीय मैदनात उतरणार आहेत. ते याआधी २०२० साली झालेल्या निवडणुकीत जिंकल्यानंतर नितीश कुमार यांच्या सरकारमध्ये मंत्री झाले होते.

बिहारमधील निवृत्त आयपीएस अधिकारी शिवदीप वामनराव लांडे हे देखील मैदानात उतरले आहेत. ते बिहारमध्ये 'सिंघम' म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी 'हिंद सेना' नावाच्या पक्षाची स्थापना केली आहे. त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेऊन राजकारणात एन्ट्री केली. ते अररिया आणि मुंगेरच्या जमालपूर या विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीत उभे राहिले आहेत. बिहारमध्ये शिवदीप लांडे हे लोकप्रिय अधिकारी आहेत. त्यांच्या स्वच्छ प्रतिमेच्या अधिकाऱ्यांना जनता किती साथ देते, हे पाहावे लागेल.

Bihar news
Satara News : डॉक्टर महिला मृत्यू प्रकरणातील आरोपी बदने आणि बनकरचा एकमेकांशी संबंध काय? कोर्टात काय युक्तिवाद झाला?

भाजपने माजी आआरएस अधिकारी सुजीत सिंह यांना तिकीट दिलं आहे. आयकर विभागात त्यांनी मुख्य आयुक्त म्हणून काम सांभाळलं आहे. त्यांनी १३ ऑक्टोबर रोजी स्वेच्छानिवृत्ती घेऊन त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ते मैदानात उतरल्याने बिहारमधील राजकारण फिरलं आहे. ते दरभंगा येथील बौराम मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

Bihar news
Satara News : सातारा डॉक्टर महिला मृत्यू प्रकरणात ट्विस्ट, पीडितेच्या हात आणि पत्रावरील हस्ताक्षर जुळत नाही? ठाकरे गटाचा मोठा दावा

बक्सरमधून भाजपच्या तिकिटावर माजी आयपीएस आनंद मिश्रा मैदानात उतरले आहेत. त्यांनी १५० हून एनकाऊन्टर केले आहेत. २०२४ साली तिकीट न मिळाल्याने ते अपक्ष निवडणुकी उभे राहिले होते. तामिळनाडूचे माजी डीजीपी ब्रजकिशोर दुबे उर्फ बी. के. रवि हे समस्तीपूर रोसडा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com