Mumbai :...तर आम्हीही रस्त्यावर उतरू; मुंबईतील कबूतरखान्यांचा वाद पुन्हा तापणार; मराठी एकीकरण समिती आक्रमक

Mumbai dadar News : मुंबईतील कबूतरखान्यांचा वाद पुन्हा तापणार आहे. कबूतरखाना सुरु करण्यावरून मराठी एकीकरण समिती आक्रमक झाली आहे.
dadar News
Mumbai dadar NewsSaam tv
Published On
Summary

मुंबई–ठाण्यात कबूतरखाने पुन्हा सुरू करण्याच्या विषयावरून वाद

मराठी एकीकरण समितीकडून या निर्णयाला तीव्र विरोध

गरज पडल्यास आम्हीही रस्त्यावर उतरू, असा समितीचा विरोध

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतरही पालिकेने हा मुद्दा जिवंत ठेवल्याचा समितीचा आरोप

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबई–ठाणे परिसरात पुन्हा कबूतरखाना सुरू करण्याचा विषय तापत असून मराठी एकीकरण समितीने यावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. 'कुठलाही कबूतरखाना पुन्हा सुरू होऊ देणार नाही; गरज पडली तर आम्हीही रस्त्यावर उतरू, अशी भूमिका समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी कडाडून चेतावणी दिली.

गोवर्धन देशमुख यांचं म्हणणे आहे की, सुप्रीम कोर्ट आणि उच्च न्यायालयाने दिलेल्या स्पष्ट आदेशांनंतरही महानगरपालिका मुद्दाम विषय जिवंत ठेवत आहे. त्यामुळे मुंबई–ठाण्यातील नागरिकांच्या आरोग्याशी मोठा धोका निर्माण होतो. समितीचा आरोप आहे की काही जैन मुनिंनी हा मुद्दा सतत तापवत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. सरकारलादेखील आंदोलनाच्या धमक्या दिल्या जात आहेत'.

dadar News
Crime News : आई की कसाई? बॉयफ्रेंडसाठी एकुलत्या एक मुलाची हत्या, परिसरात खळबळ

'लोकांना महत्त्वाची हजारो कामं आहेत, राज्यात गंभीर प्रश्न आहेत; पण काही लोक कबूतरखाना हा एकच मुद्दा वारंवार घोळवत आहेत. आम्ही शांत बसणार नाही. समुद्रकाठचे कबूतरखाने बंद झाले ते योग्य झाले—ते कायम बंदच राहिले पाहिजेत,” असा कडक इशारा देशमुख यांनी दिला.

dadar News
Tragic Accident : देवदर्शनाहून परतताना काळाचा घाला; भरधाव टूरिस्ट बसची ट्रकला धडक, १८ भाविकांचा मृत्यू

मुंबईत कुठेही कबूतरखाने पुन्हा सुरु करण्याचा कोणताही प्रयत्न झाला तर व्यापक आंदोलन उभारले जाईल, असे मराठी समितीने स्पष्ट केले. तर नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कोणत्याही निर्णयाला कडाडून विरोध केला जाईल, असेही समितीने स्पष्ट केलं.

Q

वाद नेमका कशावरून निर्माण झालाय?

A

मुंबई–ठाणे परिसरात कबूतरखाने पुन्हा सुरू करण्याच्या निर्णयावरून वाद निर्माण झालाय.

Q

मराठी एकीकरण समितीची भूमिका काय आहे?

A

कबूतरखाने पुन्हा सुरू करण्याचा कोणताही प्रयत्न झाला तर रस्त्यावर उतरू, असा इशारा समितनीने दिलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com