Leopard: दिसताच गोळ्या घाला, अनेकांचा जीव घेणाऱ्या शिरूरमधील बिबट्याला नरभक्षक घोषित, वनविभागाचे आदेश
Shirur LeopardSaam Tv

Leopard: दिसताच गोळ्या घाला, अनेकांचा जीव घेणाऱ्या शिरूरमधील बिबट्याला नरभक्षक घोषित, वनविभागाचे आदेश

Shirur leopard: पुणे जिल्ह्यातल्या शिरूरमध्ये बिबट्यामुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. या बिबट्याने १४ वर्षीय मुलाचा जीव घेतला. याआधी देखील त्याने अनेकांना ठार केले. या घटनेनंतर आता या बिबट्याला गोळ्या घालून ठार मारण्याचे आदेश वन विभागाने दिले आहेत.
Published on

Summary -

  • शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावात बिबट्याच्या हल्ल्यात १३ वर्षीय मुलाचा मृत्यू

  • वनविभागाने बिबट्याला नरभक्षक घोषित करून ठार मारण्याचे आदेश दिले

  • संतप्त ग्रामस्थांनी वनविभागाचे वाहन पेटवून आंदोलन केले

  • खासदार अमोल कोल्हे आणि आमदार शरद सोनवणे यांची कठोर कारवाईची मागणी

रोहिदास गाडगे, शिरूर

पुण्यातल्या शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावात बिबट्याच्या हल्ल्यात एका १३ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर महाराष्ट्र वनविभागाने या बिबट्याला नरभक्षक घोषित करून ठार मारण्याचे आदेश जारी केले आहेत. 'परिस्थितीचे गांभीर्य आणि वारंवार होणारे हल्ले लक्षात घेता नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचा आदेश देण्यात आला आहे,' असे वनविभागाने स्पष्ट केले. या घटनेनंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आंदोलन करत वनविभागाचे वाहन पेटवून दिले. ज्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे.

नरभक्ष्यक बिबट्याला शोधण्यासाठी शार्प शूटर्सचे पथके, ड्रोन आणि सापळा कॅमेरे तैनात करण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांतील या बिबट्याने घेतलेला हा तिसरा बळी असल्याने मानवी वस्तीजवळ वाढलेला बिबट्यांचा वावर आणि मानव-वन्यजीव संघर्षाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या बिबट्यामुळे गावकरी संतप्त झाले असून त्यांनी रास्तारोको केला आणि वनविभागाचे वाहन पेटवून दिले.

Leopard: दिसताच गोळ्या घाला, अनेकांचा जीव घेणाऱ्या शिरूरमधील बिबट्याला नरभक्षक घोषित, वनविभागाचे आदेश
Leopard Attack : बिबट्यानं आधी हल्ला केला, मग फरफटत नेलं, वृद्ध दाम्पत्याच्या मृत्यूनं हळहळ

शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथे १४ वर्षांच्या मुलावर बिबट्याने हल्ला करत त्याचा जीव घेतला. या मुलाला वाचवायला गेलेल्या बापावर बिबट्या गुरकला अन् डोळ्यासमोर बिबट्या त्यांच्या मुलाला घेऊन गेला. लेकरु गेलं आम्हाला बाळ हवं बिबट्या नको असं म्हणत रोहन बोंबेंच्या वडिलांनी प्रशासनावर रोष व्यक्त करत बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केलीय. धक्कादायक बाब म्हणजे घटना घडल्यापासून प्रशासन, वनविभागाचा एक आधिकारी कुटुंबाच्या भेटीला आला नसल्याची खंतही व्यक्त केली आहे.

Leopard: दिसताच गोळ्या घाला, अनेकांचा जीव घेणाऱ्या शिरूरमधील बिबट्याला नरभक्षक घोषित, वनविभागाचे आदेश
Leopard Attack : आई जिंकली, बिबट्या हरला...! बिबट्याची शेपूट ओढत आईने केली लेकराची सुटका

अशातच, नरभक्षक बिबट्यांना गोळ्या घाला अशी संतप्त मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली. जांबूत, पिंपरखेड परिसरातील नागरिकांच्या जिविताचे रक्षण करण्यासाठी या भागातील नरभक्षक बिबट्यांना गोळ्या घालून ठार मारण्याची मागणी केली. डॉ अमोल कोल्हे यांनी मुख्य वनसंरक्षक आशिष ठाकरे यांना पत्र पाठवले. पिंपरखेड येथी रोहन विलास बोंबे या मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी वनविभागाचे वाहन आणि कार्यालय पेटवले. या घटनेची तत्काळ गंभीर दखल घेऊन खासदार अमोल कोल्हे यांनी पुणे प्रादेशिक विभागाचे मुख्य वनसंरक्षक आशिष ठाकरे यांना पत्र पाठवून नरभक्षक बिबट्यांना ठार मारण्यासाठी एलिमिनेशन ऑर्डर काढण्यासाठी चीफ वाईल्ड लाईफ वॉर्डन, राज्य सरकार तसेच संबंधित यंत्रणेची परवानगी घेण्यासाठी त्वरीत पावले उचलावीत अशी मागणी केली.

Leopard: दिसताच गोळ्या घाला, अनेकांचा जीव घेणाऱ्या शिरूरमधील बिबट्याला नरभक्षक घोषित, वनविभागाचे आदेश
Shirur News : शेतकरी दाम्पत्याची दोन एकर शेती सातबारावरून गायब; तलाठी व मंडळ अधिकाऱ्याचा प्रताप

तर, या घटनेनंतर आम्ही बिबट्यापुढे हतबल झाल्याची भावना जुन्नर चे आमदार शरद सोनवनेची व्यक्त करत एकवेळ बिबट्या राहिल किंवा मी अशी थेट भुमिका घेऊन नरभक्षक बिबट्याला गोळ्या घाला आणि इतर बिबट्यांना जेरबंद करुन नसबंदी करा असं म्हणत बिबट्यांचा बंदोबस्त व्हावा या मागणीसाठी पुणे नाशिक महामार्गावर रोखण्याची घोषणा शरद सोनवणेंनी करत रात्रीचे आंदोलन मध्यरात्री स्थगित केलं.

Leopard: दिसताच गोळ्या घाला, अनेकांचा जीव घेणाऱ्या शिरूरमधील बिबट्याला नरभक्षक घोषित, वनविभागाचे आदेश
Shirur News : शिरूरमध्ये शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; घरी जाताना रानमळ्यात बिबट्याने झडप घातली अन्...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com