Bhimashankar : भीमाशंकर अभयारण्यातील पर्यटन स्थळांवर बंदी; पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी वनविभागाचा निर्णय

Pune News : सह्याद्री पर्वत रांगांमध्ये असलेले धबधबे, पाऊस, धुके अशा सुंदर निसर्गाचा आनंद पावसाळ्याच्या दिवसात घेता येत असतो. परंतु डोंगर दर्यातून जाताना पावसाळ्यात अपघात होण्याची अधिक भीती असते
Bhimashankar
BhimashankarSaam tv
Published On

पुणे : भिमाशंकरच्या घनदाट जंगलामधून निघालेलं पांढरंशुभ्र धुकं, डोंगरकड्यांवरून कोसळणारे धबधबे आणि निसर्गाने मुक्त हस्ताने उधळलेलं सौंदर्य. हे सारं डोळ्यांचं पारणं फेडणारं असलं तरी सध्या या सौंदर्याचा आनंद घेणं पर्यटकांसाठी धोकादायक ठरत आहे. कारण याठिकाणी पावसाळ्यात उद्भवणारा धोका आणि यामुळे होणारे अपघात लक्षात घेता पुढील दोन महिने येथे पर्यटनासाठी बंदी राहणार आहे. 

पुणे जिल्ह्यातील एकमेव असलेले श्री क्षेत्र भीमाशंकर येथे शिवलिंग दर्शन आणि सह्याद्री पर्वत रांगांमध्ये असलेले धबधबे, पाऊस, धुके अशा सुंदर निसर्गाचा आनंद पावसाळ्याच्या दिवसात घेता येत असतो. परंतु डोंगर दर्यातून जाताना पावसाळ्यात अपघात होण्याची अधिक भीती असते. यामुळे भिमाशंकर अभयारण्यात पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पर्यटनस्थळांवर बंदी घालण्यात आली आहे. 

Bhimashankar
स्कूल व्हॅन चालकाकडून ४ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार; प्रायव्हेट पार्टला इजा अन् मारहाण, परिसरात खळबळ

काही दिवस असणार बंदी 

दरम्यान धोकादायक ठिकाणी जाण्यास वन विभागाकडून स्पष्ट मनाई करण्यात आली असुन सुरक्षा रक्षकही तैनात करण्यात आले आहेत. पावसाळ्यातील धोका लक्षात घेता पुढील काही दिवस येथे पर्यटनासाठी बंदी कायम राहणार आहे. मात्र बंदी उठल्यानंतर पर्यटकांना पुन्हा येथे निसर्गाच्या सानिध्यात येऊन फिरण्याचा आनंद घेता येणार आहे. 

Bhimashankar
Akkalkuwa : घाटरस्ता वाहिल्याने अक्कलकुवा तालुक्यातील रस्ता बंद; वाहतूक पूर्णपणे खोळंबली

सिंधुदुर्गातील पर्यटन स्थळांवर गर्दी

सिंधुदुर्ग : विकेंडच्या सुट्टी निमित्त पर्यटकांनी सिंधुदुर्गातील पर्यटन स्थळांवर गर्दी केली आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर, बेळगाव या ठिकाणाहून पर्यटक कोकणात दाखल झाले आहेत. सिंधुदुर्गातील आंबोली, कावळेसाद व हिरण्यकेशी भागात पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. आंबोलीत सध्या आल्हाददायक वातावरण असून घाट परीसरात धुके व रिमझिम पाऊस अस वातावरण पाहायला मिळत आहे. याचा आनंद घेताना पर्यटक दिसून येत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com