
कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर येथे बिबट्याने पाच वर्षाच्या मुलावर हल्ला केला.
आईने बिबट्याची शेपूट पकडून आरडाओरडा केली मुलाची सुटका
जखमी चिमुकल्यावर रुग्णालयात उपचार सुरु
वन विभागाच्या निष्काळजीपणावर नागरिकांची नाराजी
सचिन बनसोडे, साम टीव्ही
अहिल्यानगरच्या कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर गावात लेकरासाठी एक आई थेट बिबट्याशी भिडल्याची घटना घडली आहे. दिवाळीच्या दिवशी अंगणात खेळणाऱ्या पाच वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याने झडप घातली. मात्र लेकरासाठी आईने थेट बिबट्याची शेपूट पकडली आणि जोरात आरडाओरडा केला. आईच्या धाडसापुढे बिबट्या हतबल झाला आणि चिमुकल्याला सोडून त्याने धूम ठोकली. जखमी चिमुकल्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ऐन दिवाळीच्या दिवशी कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर गावात एक खळबळजनक घटना घडली.. अंगणात खेळणाऱ्या पाच वर्षीय दिव्यांश पवार या चिमुकल्यावर बिबट्याने झडप घातली.. पोटच्या मुलाला बिबट्या घेऊन जात असल्याचे बघून आई मंदा पवार हिने कुठलाही विचार न करता थेट बिबट्याची शेपूट पकडी आणि जोरजोरात आरडाओरडा केला.. एका मातेचे धाडस बघून बिबट्याची हतबल झाला आणि त्याने दिव्यांश याला तिथेच सोडून धूम ठोकली.. जखमी चिमुकला दिव्यांश याच्यावर रुग्णालय उपचार सुरू असून धाडसी मातेने हा थरारक प्रसंग कथन केलाय..
दरम्यान जखमी दिव्यांशला रुग्णालयात नेण्यासाठी 108 क्रमांकाची रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.. संजीवनी युवा प्रतिष्ठान या स्थानिक संस्थेच्या मदतीने त्याला वेळेत रुग्णालयात पोहोचवण्यात आले.
कोपरगाव तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत.. मात्र वन विभाग पुरेशा उपाययोजन राबवत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. तालुक्यात वाढलेली बिबट्यांची संख्या चिंतेचा विषय बनला आहे. मात्र एका आईने आपल्या लेकराचा जीव वाचवण्यासाठी दाखवलेले धाडस कौतुकाचा विषय ठरला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.