Kolhapur : फटाके आणायला गेले,पुन्हा परतलेच नाहीत; बहीण-भावासह पुतणीचा अपघाती मृत्यू, कांबळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर

Kolhapur Accident update : फटाके आणायला गेलेल्या एकाच कुटुंबातील तिघांचा अपघाती मृत्यू झाला. या घटनेने ऐन दिवाळीत कांबळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
Kolhapur Accident
Kolhapur Accident update Saam tv
Published On
Summary

दिवाळीच्या दिवशी फटाके आणायला गेलेल्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर

चुकीच्या मार्गाने आलेल्या ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने तिघांचा मृत्यू

मृतांमध्ये भाऊ, बहीण आणि दोन वर्षांची पुतणी यांचा समावेश

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे

रणजीत माजगावकर, साम टीव्ही

राज्यभर दिवाळी सणाचा धूम पाहायला मिळत आहे. कुटुंबातील सदस्य एकत्र येत दिवाळी साजरा करत आहे. कुटुंबातील लहान मुले मोठ्या उत्साहात फटाके फोडत आहेत. दिवाळीच्या या धामधुमीदरम्यान कोल्हापुरात दुर्दैवी घटना घडली. दिवाळीचे फटाके खरेदी करायला गेलेल्या तिघांचा अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील तिन्ही जण दगावले. या घटनेने मृतांच्या कुटुंबावर ऐन दिवाळीत दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बहिणीला आणि भाच्याला घेऊन दिवाळीचे फटाके खरेदी करायला गेलेल्या दुचाकीवरून ट्रकची धडक बसून भाऊ बहीण जागीच ठार झालेत. तर या अपघातात पुतणीही मृत्युमुखी पडली. या अपघाताने शहरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. तर भाचाही गंभीर जखमी झाला आहे.

Kolhapur Accident
Raigad Shocking : रायगडमधील कोट्यवधींच्या अपहार प्रकरणात मोठा ट्विस्ट; मुख्य आरोपीने मेहुण्याच्या घरात आयुष्य संपवलं

कागल तालुक्यातील शेंडूर येथील दिपाली गुरुनाथ कांबळे आणि भाचा अथर्व यांना घेऊन फटाके खरेदी केल्यानंतर श्रीकांत बाबासाहेब कांबळे हे राधानगरी तालुक्यातील तरसंबळे या गावी दुपारी निघाले होते. यावेळी राँग साईडने आलेल्या ट्रकची जोरदार धडक त्यांना बसली.

Kolhapur Accident
Mumbai News : मुंबई महापालिकेत सर्वात मोठा बदली घोटाळा; नव्या वादाचा चेंडू थेट CM फडणवीसांच्या कोर्टात

यावेळी दुचाकीवरील श्रीकांत आणि दोन वर्षाची कौशिक सचिन कांबळे पुतणी हे जागीच ठार झाले. तर बहीण दिपाली हिचा रुग्णालयात घेऊन जात असताना वाटेत मृत्यू झाला.ऐन दिवाळीत झालेल्या या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे

Q

 कोल्हापुरातील अपघात कधी आणि कुठे झाला?

A

कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील तरसंबळे येथे दुपारी अपघात घडला.

Q

भीषण अपघातात कोणाचा मृत्यू झाला?

A

या अपघातात श्रीकांत बाबासाहेब कांबळे, त्यांची बहीण दिपाली आणि पुतणी कौशिक सचिन कांबळे यांचा मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com