Mumbai News : मुंबई महापालिकेत सर्वात मोठा बदली घोटाळा; नव्या वादाचा चेंडू थेट CM फडणवीसांच्या कोर्टात

Mumbai News update : मुंबई महापालिकेत सर्वात मोठा बदली घोटाळा झालाय. या प्रकरणाचा वाद CM फडणवीसांच्या कोर्टात पोहोचला आहे.
BMC News
Mumbai News update Saam tv
Published On
Summary

मुंबई महापालिकेत १५६ अभियंत्यांच्या बदल्या स्थगित

आमदार सुनील प्रभूंनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहून SIT चौकशीची मागणी

महापालिकेत सध्या ७०० हून अधिक अभियंता पदे रिक्त असल्याचे समोर आलंय

गट अ परीक्षा पेपरफुटी आणि बदलीतील गैरव्यवहार एकत्र उघड

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबई महापालिकेत सर्वात मोठा बदली घोटाळा उघडकीस आलाय. या घोटाळ्याने मुंबई महापालिका प्रशासनात खळबळ उडाली आहे. यानंतर पालिकेतील बढती आणि बदल्यांच्या प्रक्रियेत झालेल्या अनियमिततेची विशेष तपास पथकाच्या मार्फत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घ्यावी, अशी मागणी आमदार सुनील प्रभू यांनी मागणी केली आहे.

आमदार सुनील प्रभू यांनी मुंबई महापालिकेतील कर्मचारी बदली घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं. सुनील प्रभू यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित म्हटलं की, महापालिकेतील बदली आणि बढती प्रक्रियेत झालेल्या अनियमिततेची विशेष तपास पथक (एसआयटी) मार्फत चौकशी करण्याची मागणी केली. अलीकडेच १५६ अभियंत्यांच्या बदल्यांना स्थगिती देण्यात आल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

BMC News
Bihar Election : इंडिया आघाडीत पहिली मोठी ठिणगी पडली; आरजेडी आणि काँग्रेसचे उमेदवार आमनेसामने

प्रभू यांनी पत्रात नमूद केले आहे की, महापालिकेत ७०० हून अधिक अभियंता पदे रिक्त आहेत.प्रशासनात मर्जीतील अधिकाऱ्यांना जादा चार्ज देण्यात येत आहेत. गट अ परीक्षेतील पेपरफुटीपासून ते बदलीतील गैरव्यवहारापर्यंत अनेक प्रकार उघड झाल्याने त्यांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

BMC News
Maharashtra Politics : भाजप मंत्र्यांकडून ऑपरेशन लोटस; बडा नेता कमळ हाती घेणार?

'चौकशी पारदर्शक राहावी म्हणून नगर अभियंता आणि संचालक यांचा कारभार आयुक्तांच्या अखत्यारीत द्यावा, अशी सूचना केली आहे. प्रभू यांनी या प्रकरणात आर्थिक देवाणघेवाणीचा संशय व्यक्त करत आर्थिक गुन्हे शाखेकडूनही तपासाची मागणी केली आहे.

Q

मुंबई महापालिकेत बदली घोटाळा काय?

A

महापालिकेतील बढती आणि बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामध्ये १५६ अभियंत्यांच्या बदल्या स्थगित करण्यात आलाय.

Q

पालिकेतील या प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार आहे का?

A

सुनील प्रभू यांनी आर्थिक देवाणघेवाणीचा संशय व्यक्त केला आहे. या आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास करण्याचीही मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com