Taj Hotel viral video : पायात कोल्हापुरी चप्पल, खुर्चीवर मांडी घालून जेवायला बसल्याने ताज हॉटेलमध्ये वाद; महिलेचा व्हिडिओ व्हायरल

Taj Hotel viral video News : खुर्चीवर मांडी घालून जेवायला बसल्याने ताज हॉटेलमध्ये नव्या वादाला तोंड फुटलं. ग्राहक महिलेने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत खंत मांडली.
Taj Hotel viral news
Taj Hotel viral videoSaam tv
Published On
Summary

ताज हॉटेलमध्ये मांडी घालून जेवायला बसल्यामुळे वाद

महिलेनं हा संपूर्ण प्रकार सोशल मीडियावर शेअर केला

व्हिडिओ शेअर करत महिलेची ताज हॉटेलवर व्यक्त केली नाराजी

ताज हॉटेलच्या मॅनेजरचा महिलेच्या जेवायला बसण्याच्या पद्धतीवर आक्षेप

ताज हॉटेलमध्ये पायात कोल्हापुरी चप्पल आणि खुर्चीवर मांडी घालून महिला जेवायला बसल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. महिलेने खुर्चीवर मांडी घालून बसायला सुरुवात केल्याने ताज हॉटेलच्या मॅनेजरने रोखलं. त्यानंतर नाराज झालेल्या ग्राहक महिलेने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत खंत व्यक्त केली. या वादाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर @SharmaShradha नावाच्या हँडलवरून हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या महिलेने कॅप्शनमधूनच अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. या ग्राहक महिलेने म्हटलं की, 'मी सर्वसामान्य महिला आहे. मी मेहनत करून पैसे कमावते. आम्ही मोठ्या सन्मानासहित ताज हॉटेलमध्ये येतो. मात्र, आम्हाला आमच्यात देशात अपमान सहन करावा लागत आहे.

Taj Hotel viral news
Kolhapur : फटाके आणायला गेले,पुन्हा परतलेच नाहीत; बहीण-भावासह पुतणीचा अपघाती मृत्यू, कांबळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर

'मी नेहमीच्या पद्मासन पद्धतीने जेवायला बसली,यात माझी चुकी काय? मी जेवायला कसं बसावं, हे ताज हॉटेल शिकवणार का? असा सवाल महिलेने केला. व्हिडिओ सुरु झाल्यानंतर महिलेने म्हटलं की, 'मला खूप राग आला आहे.मी ताज हॉटेलमध्ये आहे. मी माझ्या बहिणीसोबत ताज हॉटेलमध्ये आली होती. आम्ही खूप मेहनतीने पैसे कमावतो. आम्ही दिवाळीचा फारसा काही विचार केला नव्हता. त्यामुळे बहिणीसोबत ताज हॉटेलला रात्रीचं जेवण करायला घेऊन आले'.

महिलेने दावा केला आहे की, 'मी मांडी घालून जेवायला बसल्यानंतर ताज हॉटेलचे मॅनेजर माझ्याजवळ आले. त्यांनी एका व्यक्तीला तुमच्या जेवणासाठी बसलेल्या पद्धतीवर आक्षेप आहे. कारण तुम्ही खुर्चीवर मांडी घालून बसला आहात'.

Taj Hotel viral news
Kalyan : कुटुंबीय दिवाळी साजरी करण्यात गुंग; अचानक भलंमोठं झाड ३ घरावर कोसळलं, कल्याणमधील घटना

'ताज हॉटेलमध्ये भरपूर श्रीमंत लोक येतात. त्यामुळे तुम्ही चांगल्या पद्धतीने बसला. तुमचे पाय जमिनीवर ठेवा. तर पायात क्लोज शुज असायला हवे. मी कोल्हापुरी चप्पल वापरते. त्याच्यावरही आक्षेप आहे का, मी माझ्या मेहनतीच्या पैशांनी कोल्हापुरी चप्पल खरेदी केली आहे. तीच चप्पल घालून आली आहे. मी खूप मेहनत करते. त्यानंतर या हॉटेलमध्ये आली आहे. मी सलवार कुर्ता घालून आले. मी व्यवस्थित कपडे घातले आहेत. त्याच्यावरही आक्षेप आहे का? असा सवाल या महिलेने उपस्थित केला.

Taj Hotel viral news
Bihar Election : ऐन निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का; बड्या नेत्याने दिला पक्षाचा राजीनामा

'मी हॉटेल ताज आणि रतन टाटा यांच्याविषयी मनात खूप आदर आहे. रतन टाटा आमच्या कंपनीचे गुंतवणूकदार आहेत. पण तरीही या हॉटेलच्या मॅनेजरच्या वागणुकीवर नाराज आहे, असेही तिने पुढे सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com