Pune Traffic : पुण्यातील शिरुर तालुक्यात वाहतुकीत बदल, छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथीनिमत्त अधिकाऱ्यांचे आदेश

Pune Traffic Update : कोरेगाव भिमा बाजूकडून येणारी शंभू भक्तांची वाहने कोरेगाव भीमा-वढू मार्गावरील माहेर संस्थेजवळ असणाऱ्या स्टॉपेज पॉईंटच्या पुढे जाण्यास मनाई करण्यात येईल, असंही आदेशात नमूद करण्यात आलं आहे.
Pune Shirur Taluka Traffic Changes
Pune Shirur Taluka Traffic ChangesSaam Tv News
Published On

पुणे : पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील मौजे वढू बु. येथे साजरी होणाऱ्या श्री.छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी निमित्त २८ मार्च रोजी रात्री १० वाजल्यापासून ते २९ मार्च सकाळी १० वाजेपर्यंत जड वाहतूक, माल वाहतूक (ट्रक, टेम्पो) आदी वाहनांच्या मार्गामध्ये बदल करण्यात आले आहेत. तसेच शंभू भक्तांच्या वाहनांना थांब्याच्या ठिकाणापुढे (स्टॉपेज पॉईंट) वाहने घेऊन जाण्यास मनाई करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी जारी केले आहेत.

शंभू भक्तांची वाहने वगळता कोरेगाव भीमा बाजूकडून येणारी आणि वढू बु. मार्गे चाकण किंवा पाबळला जाणारी अवजड वाहतूक कोरेगाव भीमा-सणसवाडी-शिक्रापूर गॅस फाटा-वाजेवाडी चौफुला मार्गे चाकण, पाबळ बाजूकडे जाईल. चाकण, पाबळ बाजूकडून येणारी व वढू.बु कोरेगाव भीमामार्गे पुणे बाजूकडे जाणारी अवजड वाहतूक वाजेवाडी चौफुला-गॅस फाटा-शिक्रापूर-सणसवाडी-कोरेगाव भीमामार्गे पुणे बाजूकडे जाईल.

Pune Shirur Taluka Traffic Changes
Kavita Navande : दीड लाख रुपयांच्या लाचेची मागणी, महिला क्रिडा अधिकाऱ्याला रंगेहात पकडलं; जिल्ह्यात खळबळ

कोरेगाव भिमा बाजूकडून येणारी शंभू भक्तांची वाहने कोरेगाव भीमा-वढू मार्गावरील माहेर संस्थेजवळ असणाऱ्या स्टॉपेज पॉईंटच्या पुढे जाण्यास मनाई करण्यात येईल, असंही आदेशात नमूद करण्यात आलं आहे.

Pune Shirur Taluka Traffic Changes
Santosh Deshmukh Case: निर्दयी मारहाण ते विव्हळणं; १५ व्हिडिओ अन् ८ फोटो, संतोष देशमुखांना हालहाल करून मारल्याचे पुरावे सापडले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com