Kavita Navande : दीड लाख रुपयांच्या लाचेची मागणी, महिला क्रिडा अधिकाऱ्याला रंगेहात पकडलं; जिल्ह्यात खळबळ

Sports Officer Kavita Navande Caught Taking Bribe : परभणी जिल्ह्यातील क्रीडा विभागात लाच प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे. एका क्रीडा स्पर्धेचं बिल आणि स्विमिंग पुल मान्यतेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांनी लाच मागितली होती.
sports officer Kavita Navande caught taking a bribe
sports officer Kavita Navande caught taking a bribeSaam Tv News
Published On

परभणी : परभणी जिल्ह्यातून एक मोठी खळबळजनक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील एसीबीकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे एसीबीच्या जाळ्यात अडकल्या आहेत. स्विमिंग पूल बांधण्यास परवानगी देण्यासाठी कविता नावंदे यांनी अडीच लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यातील, दीड लाखांची लाच घेताना त्यांना रंगेहात पकडलं आहे.

परभणी जिल्ह्यातील क्रीडा विभागात लाच प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे. एका क्रीडा स्पर्धेचं बिल आणि स्विमिंग पुल मान्यतेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांनी लाच मागितली होती. कविता यांनी या मंजुरीसाठी संबंधितांकडे तब्बल अडीच लाख रुपयांची लाच मागितली होती, ज्यात दीड लाख रुपये स्वीकारताना त्यांना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडलं आहे. परभणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईमुळे जिल्ह्याच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

sports officer Kavita Navande caught taking a bribe
Maharashtra Weather Update : उन्हाच्या तडाख्यातही महाराष्ट्र होणार 'अवकाळी चिंब'; पाऊस धो-धो कोसळणार, पण विदर्भ तापणार

परभणीच्या जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांना तब्बल दीड लाखांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडलं आहे. मानवत येथील एका तक्रारदाराला तिथल्या क्रीडा स्पर्धेचं बिल तसेच स्विमिंग पूलची मान्यता देण्यासाठी कविता नावंदे यांनी अडीच लाखांची लाच मागितली होती. त्यातील एक लाख रुपये पहिल्यांदाच त्यांनी घेतले होते. त्यानंतर ही रक्कम द्यायची नव्हती. त्यामुळे या तक्रारदाराने परभणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली त्या अनुषंगाने या तक्रारीची पडताळणी करण्यात आली आणि आज सापळा रचून दीड लाख रुपये स्वीकारताना कविता नावंदे यांना रंगेहात पकडण्यात आलं आहे.

दरम्यान, कविता नावंदे यांच्यावर यापूर्वीही गैरव्यवहारांचे अनेक ठपके ठेवण्यात आले होते. तर, नुकतेच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही जिल्ह्यातील २ आमदारांनी त्यांच्या कारभाराबद्दल विधिमंडळ सभागृहात लक्षवेधी मांडली होती. त्यातच, अधिकाऱ्यांनी धाड टाकून त्यांना लाच घेताना रंगेहात अटक केली आहे.

sports officer Kavita Navande caught taking a bribe
Pune Swargate Depot Case : तिनं व्रण आणि जखमा सहन केल्यात...; अ‍ॅड असीम सरोदे म्हणाले, शेवटपर्यंत मी तिच्यासोबत, स्वारगेट खटल्यात १ रुपया फी घेणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com