Santosh Deshmukh Case: निर्दयी मारहाण ते विव्हळणं; १५ व्हिडिओ अन् ८ फोटो, संतोष देशमुखांना हालहाल करून मारल्याचे पुरावे सापडले

Beed Sarpanch Santosh Deshmukh: सरपंच संतोष देशमुख यांना आरोपींनी हालहाल करून मारले. बेदम मारहाण करून त्यांची निर्दयीपणे हत्या केली. या प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीच्या मोबाईलमध्ये संतोष देशमुखांना मारहाण करण्यापासून ते मृत्यूपर्यंतचे १५ व्हिडीओ आणि फोटो सापडले आहेत.
Santosh Deshmukh Case: निर्दयी मारहाण ते विव्हळणं; १५ व्हिडिओ अन् ८ फोटो, संतोष देशमुखांना हालहाल करून मारल्याचे पुरावे सापडले
Sarpanch Santosh Deshmukh Case AccusedSaam Tv
Published On

योगेश काशिद, बीड

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपी महेश केदारेच्या मोबाइलमध्ये धक्कादायक पुरावे सापडले आहेत. संतोष देशमुखांना मारहाण केल्यापासून ते त्यांच्या मृत्यूपर्यंतचे जवळपास 15 व्हिडिओ आणि 8 फोटो आरोपीने आपल्या मोबाइलमध्ये कैद केले होते. या व्हिडिओमध्ये नेमकं काय आहे आणि ते किती मिनिटांचे आहेत याची सविस्तर माहिती समोर आली आहे.

संतोष देशमुखांना 3 वाजून 46 मिनिटांनी मारहाणीला सुरुवात केल्याचा पाहिला व्हिडिओ आहे. तर शेवटचा व्हिडिओ हा 5 वाजून 53 मिनिटांचा आहे. ज्यामध्ये संतोष देशमुख यांचा विव्हळताना एकदम लहान आवाज येत आहे. तब्बल दोन तास आरोपी संतोष देशमुख यांना मारहाण करत होते आणि व्हिडिओ देखील काढत होते. या फोटो आणि व्हिडिओ संदर्भातील डिटेल्स रिपोर्ट साम टीव्हीच्या हाती लागले आहे. या व्हिडिओ आणि फोटोमधील माहितीमधून संतोष देशमुख यांना मारहाण करायला कधी सुरुवात केली आणि त्यांचा मृत्यू कधी झाला हे स्पष्ट होत आहे. सर्व व्हिडिओ ९ डिसेंबर रोजीचे आहेत.

Santosh Deshmukh Case: निर्दयी मारहाण ते विव्हळणं; १५ व्हिडिओ अन् ८ फोटो, संतोष देशमुखांना हालहाल करून मारल्याचे पुरावे सापडले
Santosh Deshmukh Case :वाल्मीक कराड लटकणार, सुदर्शन घुलेनं पोलिसांसमोर केला गौप्यस्फोट, काय काय सांगितले?

व्हिडिओ 1 -

9 डिसेंबर रोजी आरोपींनी 3 वाजून 46 मिनिटांनी संतोष देशमुखांना मारहाण करण्यास सुरूवात केली. महेश केदारच्या मोबाइलमध्ये हा पहिला व्हिडिओ सापडला. हा व्हिडिओ 1 मिनिटं 10 सेकंदाचा आहे. 171MB चा हा व्हिडिओ आहे. या व्हिडीओमध्ये आरोपी संतोष देशमुख यांना पांढऱ्या रंगाच्या पाईप आणि वायरसारख्या वस्तूने तसेच लाथा बुक्क्यांनी मारहाण करताना दिसत आहेत.

व्हिडिओ 2 -

दुसरा व्हिडिओ 3 वाजून 47 मिनिटं 2 सेकंद दरम्यानचा आहे. 53 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये आरोपी संतोष देशमुखांना शिवीगाळ करून मारहाण करत आहेत. यातही ते पांढऱ्या रंगाचा पाईप आणि वायरने मारहाण करत संतोष देशमुख यांची पॅन्ट काढत आहेत. हा व्हिडिओ 128 MB चा आहे.

व्हिडिओ 3 -

तिसरा व्हिडिओ 3 वाजून 48 मिनिट दरम्यानचा आहे. 35 सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये आरोपी संतोष देशमुख यांना बुटाने आणि हाताने मारहाण करत आहेत. तर दुसरा आरोपी हातात वायर घेऊन पाठीमागे मुठीने मारहाण करत आहे. हा व्हिडिओ 86.9 MB चा आहे.

Santosh Deshmukh Case: निर्दयी मारहाण ते विव्हळणं; १५ व्हिडिओ अन् ८ फोटो, संतोष देशमुखांना हालहाल करून मारल्याचे पुरावे सापडले
Santosh Deshmukh Case : मोठी बातमी! संतोष देशमुखांना आम्हीच संपवले, पोलिसांसमोर आकाच्या चेल्यांनी सगळं कबूल केलं

व्हिडिओ 4 -

चौथा व्हिडिओ 3 वाजून 51 मिनिट 43 सेकंद दरम्यानचा आहे. 2 मिनिटं ४ सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये आरोपी संतोष देशमुखांना शिवीगाळ करून लवचिक पाईपने मारहाण करताना दिसत आहे यामधील काही जण शूटिंग करत आहेत. शूटिंग करणारा महेश केदार असल्याचे दिसत आहे. याच व्हिडिओमध्ये सुदर्शन घुलेची गाडी देखील दिसत आहे. हा व्हिडिओ 300 MB चा आहे.

व्हिडिओ 5 -

पाचवा व्हिडिओ 3 वाजून 52 मिनिट 26 सेकंद दरम्यानचा आहे. 7 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये आरोपी संतोष देशमुखांना मारहाण करताना आणि कॉलरला धरून त्यांना उठून बसवताना दिसत आहे.

व्हिडिओ 6 -

सहावा व्हिडिओ 3 वाजून 53 मिनिट 59 सेकंद दरम्यानचा आहे. 36 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये आरोपी संतोष देशमुख यांना तोंडावर तसेच इतर ठिकाणी मारहाण करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ 87 MB चा आहे.

Santosh Deshmukh Case: निर्दयी मारहाण ते विव्हळणं; १५ व्हिडिओ अन् ८ फोटो, संतोष देशमुखांना हालहाल करून मारल्याचे पुरावे सापडले
Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख हत्या प्रकरणाची दुसरी सुनावणी, उज्ज्वल निकम यांचा युक्तीवाद; कोर्टात काय-काय घडलं?

व्हिडिओ 7 -

सातवा व्हिडिओ 3 वाजून 54 मिनिट 22 सेकंद दरम्यानचा आहे. 14 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये आरोपी तपकिरी रंगाच्या पाईपने मारहाण करताना मोबाइलमध्ये व्हिडीओ शूट करताना एक व्यक्तीचा हात दिसत आहे. हा व्हिडिओ 35 MB चा आहे.

व्हिडिओ 8 -

आठवा व्हिडिओ 3 वाजून 54 मिनिट 32 सेकंद दरम्यानचा आहे. 4 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये आरोपी संतोष देशमुख यांना बळजबरीने काहीतरी विचारत आहेत. हा व्हिडिओ 10 MB चा आहे.

व्हिडिओ 9 -

नववा व्हिडिओ 3 वाजून 55 मिनिट 27 सेकंद दरम्यानचा आहे. 52 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये संतोष देशमुख यांना तोंडावर तसेच इतर ठिकाणी मारहाण झालेली आहे. तसेच सुदर्शन घुले हा सगळ्यांचा बाप आहे असं त्यांना म्हणायला लावून त्यांना खाली पाडून तोंडावर उभ्याने लघवी करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ 127 MB चा आहे.

Santosh Deshmukh Case: निर्दयी मारहाण ते विव्हळणं; १५ व्हिडिओ अन् ८ फोटो, संतोष देशमुखांना हालहाल करून मारल्याचे पुरावे सापडले
Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट, ३ वॉचमनच्या जबाबातून समोर आली धक्कादायक माहिती

व्हिडिओ 10 -

दहावा व्हिडिओ 3 वाजून 58 मिनिट 56 सेकंद दरम्यानचा आहे. 2 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये आरोपी संतोष देशमुख यांच्या अंगावरील सर्व कपडे काढून अंडरवेअरवर बसून त्यांना पाईपने मारहाण करत आहेत. तर दुसरा व्यक्ती शूटिंग करत आहे

व्हिडिओ 11 -

अकरावा व्हिडिओ 3 वाजून 58 मिनिट 56 सेकंद दरम्यानचा आहे. 5 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये आरोपी संतोष देशमुख यांच्या अंडरवेअरवर बसून मारहाण करत आहेत.

व्हिडिओ 12 -

बारावा व्हिडिओ 3 वाजून 59 मिनिट 18 सेकंद दरम्यानचा आहे. 12 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये आरोपी संतोष देशमुख यांना अंडरवेअरवर बसवून जबरदस्तीने त्यांचे केस ओढून बोलायला लावत आहेत. तसंच मोबाइलमध्ये शूटिंग देखील करत आहेत.

Santosh Deshmukh Case: निर्दयी मारहाण ते विव्हळणं; १५ व्हिडिओ अन् ८ फोटो, संतोष देशमुखांना हालहाल करून मारल्याचे पुरावे सापडले
Beed Santosh Deshmukh Case: केज की बीड? संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला कुठे चालणार? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष

व्हिडिओ 13 -

तेरावा व्हिडिओ 5 वाजून 34 मिनिट 05 सेकंद दरम्यानचा आहे. 1 मिनिटं 44 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये संतोष देशमुख यांना अंडरवेअरवर काळ्या रंगाच्या स्कार्पिओ गाडीजवळ उताणे झोपवल्याचे दिसत आहे. तसेच आरोपी हे संतोष देशमुख यांना रक्ताचे दाग असलेले पॅन्ट घालताना दिसत आहेत.

व्हिडिओ 14 -

चौदावा व्हिडिओ 5 वाजून 35 मिनिट 16 सेकंद दरम्यानचा आहे. 1 मिनिटं 04 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये आरोपी संतोष देशमुख यांना उठवून बसवून शर्ट घालताना दिसत आहेत. शर्ट घालण्याअगोदर फाटलेले आणि रक्ताने भरलेले बनियान फेकून देताना दिसत आहेत.

व्हिडिओ 15 -

पंधरावा व्हिडिओ 5 वाजून 53 मिनिट 52 सेकंद दरम्यानचा आहे. 24 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती विव्हळतानाचा आवाज येत आहे.

Santosh Deshmukh Case: निर्दयी मारहाण ते विव्हळणं; १५ व्हिडिओ अन् ८ फोटो, संतोष देशमुखांना हालहाल करून मारल्याचे पुरावे सापडले
Santosh Deshmukh Case : मोठी बातमी! संतोष देशमुख प्रकरणात सक्तीवर रजेवर पाठवलेल्या पोलिसांची न्यायाधिशांसोबत धुळवड?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com