
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. याप्रकरणात आवादा एनर्जी प्रकल्पाच्या तीन वॉचमनचे जबाब महत्त्वाचे ठरले आहेत. सुदर्शन घुले आपल्या साथीदारांसोबत खंडणी मागण्यासाठी आवादा कंपनीमध्ये आला होता अशी माहिती वॉचमनने दिली. त्याचसोबत या वॉचमनसमोरच सुदर्शनने संतोष देशमुखांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. वॉचमनचे जबाब साम टीव्हीच्या हाती लागले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आवादा एनर्जी प्रकल्पावरील तीन वॉचमनचा जबाब पोलिसांनी नोंदवून घेतला हा जबाब महत्त्वाचा ठरला आहे. अशोक सोनवणे, अमरदीप सोनवणे आणि भैय्यासाहेब सोनवणे हे तिघेजण आवादा एनर्जी प्रकल्पावर वॉचमन म्हणून कार्यरत होते.
या ठिकाणी ड्युटीवर असताना सुदर्शन घुले त्याच्या साथीदारासह आवादा एनर्जी प्रकल्पावर आला. यावेळी सुदर्शन घुलेने या तिन्ही वॉचमनला मारहाण केली होती. तसेच जातीवाचक शिवीगाळ केली होती. या प्रकरणात ॲट्रॉसिटी कायद्याप्रमाणे गुन्हा देखील नोंद आहे.
आवादा एनर्जी प्रकल्पाचे मॅनेजर शिवाजी थोपटे यांना सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदाराने याच वॉचमन समोर २ कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. ही खंडणी नाही दिली तर कंपनी बंद करा अशी धमकी देखील सुदर्शन घुलेने दिली होती. हे भांडण सोडवण्यासाठी सरपंच संतोष देशमुख या ठिकाणी पोहोचले होते.
'कंपनी बंद करू नका. लोकांना रोजगार मिळू द्या.' असे सरपंच संतोष देशमुख हे सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदारांना सांगत होते. त्यावेळी सुदर्शन घुलेने सरपंच देशमुख यांना 'सरपंच तुला बघून घेऊ. तुला जिवंत सोडणार नाही.', अशी धमकी दिली होती.' असा जबाब वॉचमनने दिला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.