Shirur News : फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट न केल्याने भयानक कृत्य; टोळक्याचा तरुणावर जीवघेणा हल्ला

Pune News : किरकोळ कारणांवरून हमरीतुमरीवर येत जीवघेणा हल्ला केला जात आहे. अशात सोशल मीडियावरील फ्रेंड रिक्वेस्ट न स्वीकारल्याचे कारणावरून तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार शिरूर तालुक्यात घडला
Shirur News
Shirur NewsSaam tv
Published On

शिरूर (पुणे) : अगदी क्षुल्लक कारणांवरून हाणामारीवर येत काही वेळी जीव देखील घेतला जात असल्याच्या घटना घडल्या आहेत. अशात सोशल मीडियावर पाठविलेली फ्रेंड रिक्वेस्ट तरुणाने एक्सेप्ट केली नाही. या क्षुल्लक कारणावरून तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना शिरूर तालुक्यात घडली आहे. यात तरुण जखमी झाला असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पुण्याच्या शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी गावात हि धक्कादायक घटना घडली आहे. सदरची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. एका तरुणाला सोशल मीडियावरून फ्रेंड रिक्वेस्ट पाठविण्यात आली होती. मात्र फ्रेंड रिक्वेस्ट न स्वीकारल्याच्या क्षुल्लक कारणावरून २१ वर्षीय तरुणावर चार ते पाच अल्पवयीन मुलांच्या टोळक्याने जीवघेणा हल्ला चढवला. पाठलाग करत मारहाण करण्यात आली आहे. 

Shirur News
Accident News : पंक्चर कार बाजूला घेताना वाहनाची धडक; दोघांचा जागीच मृत्यू, समृद्धी महामार्गावरील भीषण दुर्घटना

मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद 

फ्रेंड रिक्वेस्ट न स्वीकारल्यामुळे संतापलेल्या अल्पवयीनमुलांच्या टोळक्याने टाकळी हाजीतील २१ वर्षीय तरुणाला निर्दयीपणे मारहाण केली. लाठ्या-काठ्यांनी बेदम चोप देत जीव घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या या घटनेचे सीसीटीव्हीत टिपलेले दृश्य अंगावर काटा आणणारे ठरत आहेत. या घटनेमुळे सोशल मीडियाच्या चुकीच्या वापराचा गंभीर सवाल उभा राहिला आहे.

Shirur News
Prakash Ambedkar : ओला दुष्काळ जाहीर करायला वेळ का?; दुष्काळाच्या मुद्द्यावरून प्रकाश आंबेडकरांचा सरकारवर निशाणा

पोलिसात गुन्हा दाखल 

या हल्ल्यात अल्पवयीन तरुणांचा सहभाग असल्याने सोशल मीडियाच्या अतिरेकाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपींवर गुन्हा दाखल केला असून, मारहाण करणाऱ्या मुलांच्या टोळक्याचा शोध पोलीस घेत आहेत. तर मारहाणीत तरुण जखमी झाला आहे. मात्र सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरताना जबाबदारीने वागण्याचे आवाहन नागरिकांना केले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com