Latur Accident  Saam Tv
महाराष्ट्र

Latur Accident: अपघाताने स्वप्न हिरावले, पासपोर्ट काढायला गेलेल्या दोन्ही जिवलग मित्रांचा मृत्यू!

Latur Tractor And Bike Accident: ट्रॅक्टर आणि दुचाकीच्या भीषण अपघातामध्ये या तरुणांचा मृत्यू झाला. लातूरच्या घोणसी- गुडसूर मार्गावर ही घटना घडली.

Priya More

संदीप भोसले, लातूर

लातूरमध्ये भीषण रस्ते अपघातामध्ये दोन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. परदेशामध्ये नोकरीसाठी जाण्याचं या तरुणांचं स्वप्न अपूर्ण राहिलं. ट्रॅक्टर आणि दुचाकीच्या भीषण अपघातामध्ये या तरुणांचा मृत्यू झाला. लातूरच्या घोणसी- गुडसूर मार्गावर ही घटना घडली. या अपघाताचा तपास लातूर पोलिसांकडून सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लातूरच्या जळकोट तालुक्यातील मेवापूर येथे राहणारे दोन मित्र नोकरीसाठी सौदी अरेबियात जाणार होते. परदेशामध्ये नोकरी मिळावी यासाठी त्यांचे गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न सुरू होते. परदेशामध्ये जाण्यासाठी त्यांच्याकडे पासपोर्ट नव्हते. हेच पासपोर्ट काढण्यासाठी दोघेही शनिवारी लातूरच्या पासपोर्ट कार्यालयात गेले होते.

पासपोर्ट काढून घरी परत येत असताना या तरुणांवर काळाने घाला घातला. दुचाकीवरून ते घरी जात होते. अशातच घोणसी ते गुडसूर मार्गावर ट्रॅक्टरला त्यांच्या दुचाकीने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातामध्ये दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी तात्काळ या दोन्ही तरुणांना उपचारासाठी उदगीरच्या शासकीय रुग्णालयामध्ये हलवले. पण डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषीत केले. सुनील राठोड आणि भरत गोपनर असं या मृत तरुणांची नावं आहेत. या अपघाताचा तपास लातूर पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Sri Lanka : टीम इंडियाची सुपर ओव्हरमध्ये झुंजार खेळी, श्रीलंकेच्या तोंडून हिसकावला विजयाचा घास

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

SCROLL FOR NEXT