Mumbai Local: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लातूर-बीदर एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड; प्रवाशांचे हाल

Latur Bidar Express: कळवा रेल्वे स्थानकाजवळ लातूर बिदर एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.
Mumbai Local: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लातूर-बीदर एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड; लोकलसेवेवर मोठा परिणाम
Mumbai Local TrainSaam Tv
Published On

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कळवा रेल्वे स्थानकाजवळ लातूर बिदर एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे मुंबईच्या दिशेने येणाऱ्या लोकलसेवेवर परिणाम झाला आहेत. सीएसएमटीच्या दिशेने जाणारी लोकलसेवा अर्धातास उशिराने सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. सोमवारी सकाळी लातूर -बीदर एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये अचानक बिघाड झाला. कळाव रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वेच्या इंजिनमध्ये बिघाड झाला. त्यामुळे ही एक्स्प्रेस एकाच ठिकाणी थांबून आहे. या एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहे. यामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. लोकलसेवा उशिराने सुरू आहे. त्यामुळे सर्वच रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे.

Mumbai Local: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लातूर-बीदर एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड; लोकलसेवेवर मोठा परिणाम
Mumbai Dam Water Level: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! मुसळधार पावसामुळे ४ धरणं पुन्हा ओव्हर फ्लो, वाचा ताजी आकडेवारी

लातूर-बीदर एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेची सीएसएमटीच्या दिशेने जाणारी लोकलसेवा उशिराने सुरू आहे. लोकलसेवा अर्धातास उशिराने सुरू आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे मुंबईमध्ये नोकरीसाठी येणाऱ्यांना आज ऑफिसला पोहचायला उशिर होणार आहे. त्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ऑफिसला लेटमार्क लागणार आहे. कर्जत, बदलापूर, कल्याणवरून मुंबईमध्ये मोठ्या संख्येने नागरिक नोकरीनिमित्त येत असतात.

Mumbai Local: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लातूर-बीदर एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड; लोकलसेवेवर मोठा परिणाम
Mumbai Local News: मुंबईकरांनो कृपया लक्ष असू द्या! पश्चिम रेल्वे मार्गावर ३५ दिवसांचा ब्लॉक, आताच करा प्रवासाचे नियोजन

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com