

रेल्वे स्टेशनलगतच्या पार्किंगमध्ये ठेकेदाराकडून लूट
नागरिकांची आता लूट चव्हाट्यावर
ठेकेदारांकडून आकाराले जातंय तब्बल पाचपट शुल्क
संजय गडदे,साम टीव्ही
मुंबई : अंधेरी पूर्वेकडील रेल्वे स्टेशनलगतच्या पार्किंगमध्ये ठेकेदाराकडून सुरू असलेली लूट आता चव्हाट्यावर आली आहे. पश्चिम रेल्वे प्रशासनाने दोन ते तीन तासांसाठी फक्त १० रुपये पार्किंग शुल्क निश्चित करून दिले आहेत. मात्र, प्रत्यक्षात ठेकेदार दुप्पट ते तब्बल पाचपट शुल्क वसूल करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
दुचाकी चालकांकडून तासभर पार्किंगसाठी ३० ते ४० रुपये जबरदस्तीने उकळले जात आहेत. दर विचारणाऱ्या नागरिकांशी कंत्राटी कामगारांचा वाद, धमक्या आणि गैरवर्तनाचे प्रकारही वारंवार घडत आहेत. अधिकृत दर सूची प्रदर्शित न ठेवणे, बिनबुडाचे पावती पैसे घेणे आणि प्रवाशांना दबाव आणून अतिरिक्त शुल्क वसूल करणे ही सर्व प्रणालीच अवैध आणि निर्ढावलेली झाली आहे. वाहनचालकांकडून यावर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पश्चिम रेल्वेकडून ठेकेदारांवर कठोर कारवाई करून ही अवैध वसुली तात्काळ थांबवावी, अशी जोरदार मागणी होतेय. अंधेरी स्टेशन परिसरात जनतेची उघडपणे लूट करणाऱ्या या पार्किंग ठेकेदारावर आता प्रशासनाने लगाम घालणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विचारले असता आम्ही सुरुवातीला 30 रुपये घेतो आणि गाडी घेऊन जाताना त्यांचे पैसे वरचे वीस रुपये त्यांना पुन्हा देतो असा दावा करण्यात आला. मात्र प्रत्यक्षात आम्ही त्या ठिकाणी 15 ते 20 दुचाकी चालकांना विचारल्यानंतर तुम्हाला पैसे परत मिळतात का, त्यावर त्यांनी आजपर्यंत आमच्याकडून तासांभरासाठी तीस तीस रुपये वसूल केलेले आहेत. मात्र कंत्राटदाराकडून वीस रुपये आम्हाला पुन्हा कधीही मिळालेले नाही, असे सांगण्यात आले. यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर वाहन चालकांची लूट होत असल्याचा प्रकार समोर आलाय.
अंधेरी पूर्व स्थानक परिसरात दररोज किमान 5000 दुचाकी चालक या ठिकाणी आपली वाहने पार्किंग करत असतात, असे प्रत्येकाकडून वीस रुपये लुटले गेले तर अंतराचे कामगार या ठिकाणी साधारणपणे दहा लाख रुपये इतकी लूट करत आहेत. यामुळे अशा कंत्राटदारावर रेल्वेने कारवाई केली पाहिजे, अशी मागणी आता या ठिकाणी वाहन पार्किंग करण्यात येणाऱ्या दुचाकी चालकांकडून करण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.