कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

Raigad Shocking : रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने अकोल्यात शोककळा पसरली आहे.
raigad news
raigad Saam tv
Published On

अक्षय गवळी, साम टीव्ही

रायगडच्या काशिद समुद्र किनाऱ्यात दोन व्यक्तीचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. दोन्ही व्यक्ती अकोला जिल्ह्यातील होते. अकोला जिल्हा प्रशासनाकडून मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. या घटनेने अकोल्यात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अकोला येथील एका क्लासेसचे 12 विद्यार्थी आणि 3 शिक्षक हे फिरण्याकरिता रायगड जिल्ह्यातील काशिद बीच येथे गेले होते. त्यातील 2 विद्यार्थी आणि 1 शिक्षक असे पाण्यात बुडाले असल्याचे समजतं आहे. त्यापैकी 1 विद्यार्थी आणि एका शिक्षकाचा मृत्यू झाला आहेत. तर एक विद्यार्थी सुखरूप आहे.

raigad news
Gen-Z Podcast Bulletin : टीव्ही विश्वातील पहिलं Gen Z बुलेटिन फक्त साम टीव्हीवर; कधी आणि कुठे-कुठे बघायला मिळणार? वाचा

राम कुटे (६०), आयुष रामटेके (१९) असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. दोघांचे मृतदेह हे शवविच्छेदनासाठी जवळील रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तर या घटनेत १७ वर्षीय आयुष बोबडे हा विद्यार्थी सुखरुप आहे. सदर घटना मुरुड पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे. मुरुड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरु केलं. पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास सुरु केला आहे.

नेमकं काय घडलं?

अकोल्यातील एका शिकवणी क्लासेस विद्यार्थी आणि शिक्षकांसह काही सहकार्यांची सहल रायगड जिल्ह्यातील काशीद बीच परिसरात फिरण्यासाठी गेली होती. आज सायंकाळी साडेपाच वाजता सुमारास समुद्राकाठी उतरले असता समुद्राच्या लाटेत वाहून गेले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या घटनेत शिक्षक राम कुटे यांचा दुर्देवी मृत्यू झाला असल्याच समजते आहे.

आयुष बोबडे या 17 वर्षीय विद्यार्थीला वाचवण्यात यश आले असून तो सुखरूप आहे. तर आयुष रामटेके या 19 वर्षीय तरुणाचा देखील मृत्यू झालाय. आयुष हा शिकवणी क्लासेसचा विद्यार्थी नसून शिक्षकांच्या घराशेजारील राहणारा तरुण होता, असे काही शिक्षकांचे म्हणणे आहे. दरम्यान, फिरण्यासाठी सोबत आलेले शिकवणी क्लासमधील केवळ तीन विद्यार्थी होते आणि तिन्ही सुखरूप असल्याचे शिकवणी क्लासेसच्या शिक्षकांकडून सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com