Gen-Z Podcast Bulletin : टीव्ही विश्वातील पहिलं Gen Z बुलेटिन फक्त साम टीव्हीवर; कधी आणि कुठे-कुठे बघायला मिळणार? वाचा

India’s first-ever Gen Z bulletin on television : टीव्ही विश्वातील Gen Z बुलेटिन फक्त साम टीव्हीवर पाहायला मिळेल. तुम्हाला हे पॉडकास्ट कधी पाहायला मिळेल, जाणून घ्या.
Gen-Z Podcast on Saam tv
Gen-Z Podcast Bulletin Saam tv
Published On

मीम्स, रील्स, पॉडकास्ट्स...हल्ली सगळंच स्मार्ट झालंय आणि ते सगळं होतंय स्मार्ट टेक्नॉलॉजीनं. जगातील अर्ध्याहून अधिक Gen Z लोकांनी AI चा वापर करून कंटेंट तयार केलाय. तसंही हल्ली Gen Z म्हणजे फक्त मोबाइलच्या दुनियेत अडकलेली पिढी असं समजलं जातं. पण तसं अजिबातच नाही. ही पिढी मल्टिटास्किंग आहे. जागरूक आणि नवनव्या कल्पना रुजवणारी, आत्मसात करणारी ही पिढी आहे.

विशेष म्हणजे क्लायमेंट चेंजपासून ते मानसिक आरोग्यापर्यंत आणि फिटनेसपासून फॅशनपर्यंत सगळं काही या Gen Z पिढीला माहीत असतं आणि माहिती करून घ्यायचं असतं. स्मार्ट असलेल्या जगातील स्मार्ट टेक्नॉलॉजी, त्यात दररोज होणारे बदल आणि अपडेट्स याच पिढीपर्यंत नव्हे तर, स्मार्ट पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या हेतूने साम टीव्हीनं देशातील पहिलं GenZ बुलेटिन (The very first Gen Z bulletin on a TV channel in India) सुरू केलं आहे.

Gen-Z Podcast on Saam tv
Multibagger stocks : छप्परफाड कमाई! २० पैशांच्या शेअरने आयुष्य बदललं, १ लाखांचे झाले 3,50,00,000 रुपये

भारतासह संपूर्ण जगावर कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) प्रभाव झपाट्यानं वाढत आहे. एआयमुळे उद्योग, शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या क्षेत्रात नवे बदल घडत आहेत. बदलत्या काळात एआयचा अभ्यास अनेकांसाठी करिअरमधील गेम चेंजिंग टर्निंग पॉइंट ठरतोय. खरंतर जेन-झी पिढीसह सर्वच वयोगटातील लोकांनी एआयची माहिती आणि वापर समजून घेणं काळाची गरज बनली आहे. या पार्श्वभूमीवर साम टीव्ही आपल्या प्रेक्षकांसाठी खास पॉडकास्ट घेऊन येत आहे.

वृत्त वाहिनींच्या इतिहासात पहिला ‘Gen-Z पॉडकास्ट साम टीव्ही प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. हा पॉडकास्ट दर शनिवारी रात्री साडेनऊ वाजता पाहायला मिळेल. या पॉडकास्टमधून एआयचे महत्व, अपडेट, त्याचा समाजावर परिणाम, भविष्याच्या संधींवर चर्चा होईल. तंत्रज्ञान आणि नव्या विचारांच्या संगम अनुभवण्यासाठी  ‘Gen-Z पॉडकास्ट’ पाहायला विसरू नका. साम टीव्हीचं खास बुलेटिन टीव्ही व्यतिरिक्त फेसबुक, ट्विटर, इन्टाग्रामसह सर्व प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com