

सध्या लोक पारंपरिक गुंतवणुकीपेक्षा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू लागले आहेत. अनेक जण आता शेअर बाजारातील गुंतवणुकीकडेही वळू लागले आहेत. या शेअर बाजाराचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत. याच शेअर बाजारातील मल्टिबॅगर स्टॉक्सने गुंतवणूकदारांना मालमाल केले आहे. ईस्ट इंडिया ड्रम्स अँड बॅरेल्स मॅन्युफॅक्चरिंग लिमिटेडच्या मल्टीबॅगर स्टॉकने गुंतवणूकदारांना करोडपती केलं आहे.
या कंपनीच्या शेअरची किंमत पाच वर्षांपूर्वी केवळ २० पैसे होती. आज याच शेअरची किंमत ७१.६२ रुपये झाली आहे. या शेअरने तब्बल ३५००० टक्के परतावा दिला आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने पाच वर्षांपूर्वी १ लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्या गुंतवणुकीची किंमत सुमारे ३.५ कोटी रुपये झाली असती.
ईस्ट इंडिया ड्रम्स अँड बॅरेल्स मॅन्युफॅक्चरिंग लिमिटेड ही कंपनी रसायन, तेल व इतर उद्योगांसाठी बॅरल्स आणि मोठे ड्रम तयार करते. बीएसईच्या माहितीनुसार, कंपनीचे सध्याचे मार्केट कॅप १०५.८१ कोटी रुपये आहे. कंपनी दरवर्षी २३ लाखांहून अधिक ड्रम्स तयार करते.
या कंपनीच्या शेअरने केवळ पाच वर्षांत नव्हे, तर गेल्या एक वर्षातही जवळपास २००० टक्के परतावा दिला आहे. उदाहरणार्थ, जर एखाद्याने एक वर्षापूर्वी १ लाख रुपये गुंतवले असते, तर त्याला आज २० लाख रुपये मिळाले असते. गेल्या वर्षी जूनमध्ये या स्टॉकची किंमत ३३.४० रुपये होती. आज ती ७१.६२ रुपये झाली आहे.
टीप -
लेखातील माहिती सामान्य माहितीच्या उद्देशाने देण्यात आली आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखी असते. शे अर बाजारात गुंतवणूक करताना आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे. साम टीव्हीकडून कोणालाही गुंतवणुकीचा सल्ला दिला जात नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.