Heat Wave Saam tv
महाराष्ट्र

Heat Wave : उष्णतेची लाट; जळगाव, वर्ध्यात तापमान पोहचले ४४ अंशांवर

Rajesh Sonwane

चेतन व्यास 
जळगाव/वर्धा
: यंदाचा उन्हाळा अधिक तीव्र राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून याची चाहूल मार्च महिन्यातच लागली होती. मात्र आता तापमानाची तीव्रता अधिक वाढण्यास सुरवात झाली असून राज्यात (Heat Wave) उष्णतेची लाट आल्याचे जाणवत आहे. याच दरम्यान (Jalgaon) जळगाव आणि वर्धा जिल्ह्यातील तापमान ४४ अंशावर पोहचले आहे. यंदाचे हे सर्वाधिक तापमान समजले जात असून आगामी दोन- तीन दिवसात तापमानात आणखीन वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.  

वर्धा (Wardha) जिल्ह्याचे तापमान ४४ अंशांवर पोहोचले आहे. सकाळी नऊ वाजल्यापासूनच उष्णतेच्या तीव्र झळा जाणवत आहेत. वाढत्या (Temperature) तापमानामुळे दुपारच्या सुमारास वर्धा शहरातील रस्त्यांवर वर्दळ कमी झाली आहे. पुढील दोन दिवस आणखी तापमान वाढणार असल्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. या तापमान वाढीमुळे घराबाहेर निघताना काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

जळगाव जिल्ह्यात तापमानाचा उच्चांक 
जळगाव
: जिल्ह्यात उष्णतेची लाट असून, जिल्ह्यात तापमानाने उच्चांक गाठत ४३.६ अंशांची नोंद झाली. मागील काही दिवसांपासून उष्णतेच्या झळा जाणवत असून पुढील काही दिवस उष्णतेच्या लाटेचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. दरम्यान जळगावखालोखाल धुळे ४२, मालेगाव ४२.८ अंश तापमानाची नोंद झाली आहे. जळगावला यंदाच्या हंगामातील आतापर्यंतच्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baba Siddiqui Death:सलमान खानला मारण्याची सुपारी, पानिपतमधून पनवेल पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Rahu Nakshtra Gochar: राहुच्या नक्षत्र गोचरमुळे 'या' राशी होणार मालामाल; नव्या नोकरीसह मिळणार अफाट पैसा

Maharashtra Politics: अखेर ठरलं! मविआचा जागा वाटपाचा तिढा सुटला, १००-८०-८० फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब

Maharashtra News Live Updates: भाजपचे अनेक नाराज पदाधिकारी आज ठाकरेंची मशाल घेणार

BMC Job: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी; मिळणार १४२००० पगार; असा करा अर्ज

SCROLL FOR NEXT