Sambhajinagar Accident : लग्न सोहळ्याहून परत येताना आई-मुलावर काळाचा घाला; टेम्पोची दुचाकीला धडक

Sambhajinagar News : लग्न सोहळा आटोपल्यानंतर ते घरी येण्यासाठी निघाले होते. घरी पोहचण्यापूर्वी पैठणकडे जाणाऱ्या कांद्याने भरलेल्या टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली
Sambhajinagar Accident
Sambhajinagar AccidentSaam tv

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : पैठण- छत्रपती संभाजीनगर मार्गावर कांदे घेऊन जाणाऱ्या टेम्पोचा आणि एका दुचाकीचा भीषण (Accident) अपघात झाला. या अपघातात आई आणि मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. हे दोघेही लग्न सोहळ्यातून घरी परताना अपघात झाला.

Sambhajinagar Accident
Palghar News: दाभोसा धबधब्यात पोहण्यासाठी गेला, १२० फुटावरून उडी मारली अन् डोहात बुडाला; तरुणाचा भयानक मृत्यू

मुमताज शेख व समीर शेख असे मृत आई व मुलाचे नाव आहे. समीर हा आपल्या आईसोबत दुचाकीने शेवगाव येथे नातेवाईकाच्या लग्नाला (Marriage) गेला होता. लग्न सोहळा आटोपल्यानंतर ते घरी येण्यासाठी निघाले होते. घरी पोहचण्यापूर्वी पैठणकडे (Paithan) जाणाऱ्या कांद्याने भरलेल्या टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीला धडक बसल्यानंतर दोघेही दूरवर फेकले गेले. यात मायलेकांचा जागीच मृत्यू (Death) झाला. 

Sambhajinagar Accident
Buldhana Accident : ट्रक- डंपरची धडक; एकाचा जागीच मृत्यू, दोन गंभीर जखमी

रस्त्याच्या कामामुळे रोजच अपघात 

दरम्यान पैठण- छत्रपती संभाजीनगर (Sambhajinagar) रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे सद्या फक्त एका बाजूनेच वाहतूक सुरू आहे. यामुळे रहदारीला अडचणीचे ठरत असून या मार्गावर रोज छोटे- मोठे अपघात होत असल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com