Buldhana Accident : ट्रक- डंपरची धडक; एकाचा जागीच मृत्यू, दोन गंभीर जखमी

Buldhana News : रात्रीच्या सुमारास अवैध रेती वाहतूक करत डंपर भरधाव वेगाने रस्त्यावर धावतात. यातच हा अपघात झाला आहे
Buldhana Accident
Buldhana AccidentSaam tv

बुलढाणा : अवैध रेती वाहतूक करणारे भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने समोरून येत असलेल्या ट्रकला धडक दिली. या भीषण अपघातात (Accident) एकाच जागीच मृत्यू झाला. तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

Buldhana Accident
Nashik Lok Sabha: शिंदे गटाची ताकद वाढली, ठाकरेंना जबर धक्का; बड्या नेत्याने ऐनवेळी सोडली साथ

नागपूर पुणे महामार्गावर (Buldhana) रात्रीच्या सुमारास हा भिषण अपघात झाला. रात्रीच्या सुमारास अवैध रेती वाहतूक करत डंपर भरधाव वेगाने रस्त्यावर धावतात. यातच हा अपघात झाला आहे. अवैध रेती वाहतूक करणारा डंपर भरधाव वेगाने जात असताना समोरून येणाऱ्या ट्रकला जाऊन धडकला. या अपघातात ट्रक चालक जागीच ठार झाला. तर दोन जण  गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सिंदखेडराजा तालुक्यातील किनगावराजा येथे घडली. 

Buldhana Accident
Prakash Ambedkar in Jalgaon : PM मोदी दिल्लीतील उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनाही भेटायला तयार नव्हते; प्रकाश आंबेडकरांची टीका

जखमींची प्रकृती गंभीर 

सदर अपघातातील जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी शासकीय रुग्णाल्यात (Ghati Hospital) भरती करण्यात आले आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. जेसीबी व क्रेनच्या सहाय्याने दोन्ही वाहने हटविण्यात आली असून रस्ता मोकळा करत वाहतूक सुरळीत करण्यात आली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com