Palghar News: दाभोसा धबधब्यात पोहण्यासाठी गेला, १२० फुटावरून उडी मारली अन् डोहात बुडाला; तरुणाचा भयानक मृत्यू

Palghar Breaking news: दाभोसा धबधब्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन हौशी तरुणांनी तब्बल १२० फुटावरून पाण्यात उडी घेतली. यातील एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाला.
Jawhar Taluka Dabhosa Falls
Jawhar Taluka Dabhosa Falls Saam TV

फैयाज शेख, साम टीव्ही

Jawhar Taluka Dabhosa Falls

पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात रविवारी (ता. ५) दुपारच्या सुमारास एक भयानक घटना घडली. दाभोसा धबधब्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन हौशी तरुणांनी तब्बल १२० फुटावरून पाण्यात उडी घेतली. यातील एक तरुण वरती आलाच नाही. तो पाण्यात बुडाला. दुसरा वर आला, पण तो गंभीर जखमी झाला. ही थरारक घटना व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Jawhar Taluka Dabhosa Falls
Weather Forecast: उन्हाच्या झळांपासून मिळणार दिलासा; विदर्भ, मराठवाड्यात आज पावसाची शक्यता

माज शेख असं मृत तरुणाचं नाव आहे. तो मुंबई मिरा-भाईंदर येथील रहिवासी आहे. तर जोएफ शेख असं जखमी तरुणाचं नाव आहे. त्याच्या कमरेला, पायाला आणि मानेला जबर मार लागला आहे. उपचारासाठी जोएफला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिरा-भाईंदर येथे राहणारे तीन तरुण रविवारी पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात असलेल्या दाभोसा धबधब्याजवळ आले होते. त्यांना येथील पाण्याच्या आणि डोहाच्या खोलीचा कुठलाच अंदाज नव्हता. यातील दोन हौशी तरुणांनी धबधबा सुरू होतो तेथून थेट पाण्यात उडी घेतली.

तिसरा तरुण त्यांचा व्हिडीओ काढत होता. दरम्यान, १२० फुटावरून उडी घेतल्यानंतर यातील माज शेख हा तरुण पाण्याच्या वर आलाच नाही. तो खोल डोहात बुडाला. दुसरा तरुण जोएफ हा कसाबसा वरती आला, मात्र तो गंभीर जखमी झाला.

आरडाओरड झाल्यानंतर स्थानिकांनी धबधब्यावर धाव घेत जोएफ याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. सध्या पोलीस माज शेख याचा मृतदेह शोधत आहे. मुंबई किंवा बाहेगावाहून येणाऱ्या हौशी पर्यटकांना दाभोसा धबधब्यातील पाण्याचा अंदाज येत नाही.

पोहण्याची क्षमती कमी असतानाही तरुण डोहाच्या खोल पाण्यात उतरण्याचं धाडस करतात. त्यामुळे अशा घटना घडतात. कृपया आपल्या पालकांनी मुलांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. ते कुठे जातात, काय करतात याबाबत चौकशी करणे गरजेचे आहे. असं जव्हार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजकुमार ब्राह्मणे यांनी म्हटलं आहे.

Jawhar Taluka Dabhosa Falls
Mumbai Local : तीन प्रवाशांच्या मृत्यूनंतर मध्य रेल्वेला आली जाग; लोकलच्या गर्दी नियंत्रणासाठी घेतला मोठा निर्णय

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com