Jalgaon Cyber Crime Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Crime : अश्‍लील व्हिडिओ बनवून वृद्धाकडून ४३ लाख लुबाडले; सायबर पोलिसात तक्रार

Jalgaon News : २५ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२४ दरम्यान वेळोवेळी पूजा शर्मा, संजय माथूर, राहुल शर्मा अशा वेगवेगळ्या व्यक्तींच्या मोबाईल क्रमांकावरून मॅसेज आणि व्हिडिओ कॉल करून अश्‍लील संभाषण केले

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : सोशल मीडियावरून होत असलेल्या फसवणूक सुरूच आहे. दरम्यान जळगावातील एका वृद्धाला व्हिडिओ कॉल करून (Jalgaon) महिलेने व्हिडिओ शूटिंग करत फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. यात सदरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, तो डीलीट (Cyber Crime) करायच्या नावाने वृद्धाकडून ४३ लाख ३ हजार ४९० रुपये उकळल्याचा प्रकार घडला आहे. (Maharashtra News)

जळगाव शहरातील शिवाजीनगर येथे वास्तव्यास असलेल्या ६५ वर्षीय वृद्धाची फसवणूक झाली आहे. या घटनेत २५ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२४ दरम्यान वेळोवेळी पूजा शर्मा, संजय माथूर, राहुल शर्मा अशा वेगवेगळ्या व्यक्तींच्या मोबाईल क्रमांकावरून मॅसेज आणि व्हिडिओ कॉल करून अश्‍लील संभाषण केले. (Crime News) दरम्यान व्हिडीओ कॉल करत ऑनलाइन पद्धतीने या वृद्धास कपडे काढण्यास सांगून तसाच व्हिडिओ रेकॉर्ड केला. यानंतर हा व्हिडिओ यूट्यूबवर व्हायरल झाला असून, तो डीलीट करायचा असेल तर पैसे द्यावे लागतील; अन्यथा तुमच्या घरी पोलिस पाठवू अशा प्रकारे ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून ४३ लाख तीन हजार ४९० रुपयांची खंडणी ऑनलाइन पद्धतीने उकळली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अखेर पोलिसांत दिली तक्रार 
वारंवार होत असलेल्या धमकी व पैसे वसुलीबाबत त्रस्त वृद्धाने जळगाव (Cyber Police) सायबर पोलिसांत संजय माथूर आणि राहुल शर्मा असे बनावट नाव सांगणाऱ्या मोबाईलधारक व बँक खातेधारकाविरुद्ध तक्रार दिली. या प्रकरणी सायबर पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील तपास करीत आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

Ambarnath Crime : अंबरनाथमधील हल्ला प्रकरणात धक्कादायक खुलासा; सहा तरुणांविरोधात गुन्हा दाखल

Politics : 'ED-CBIची चौकशी थांबवा; आम्ही भाजपमध्ये येतो...' बड्या खासदाराचा खळबळजनक दावा

Crime: 'एका रात्रीत तीन वेळा...', घरी बोलावून घेतलं, खासदाराकडून २ तरुणांवर बलात्कार

Cyber Crime: बॅंकिग फ्रॉड टाळण्यासाठी 'या' टिप्स करा फॉलो

SCROLL FOR NEXT