Pachora Crime
Pachora CrimeSaam tv

Pachora Crime : एकाच रात्री दोन मंदिरातील दानपेटी फोडल्या; पाचोऱ्यातील घटना

Jalgaon Pachora : मंदिरातील दानपेट्या फोडून त्यातील रोकड व दागिने लांबविण्यात आले आहेत. पोलिसांनी पंचनामा करून अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे
Published on

पाचोरा (जळगाव) : पाचोरा शहरातील त्र्यंबक नगर व कृष्णापुरी या गजबजलेल्या भागात पहाटेच्या सुमारास (Jalgaon) मंदिरातील दानपेटी फोडल्याच्या घटना समीर आल्या आहेत. मंदिरातील दानपेट्या फोडून त्यातील रोकड व दागिने लांबविण्यात आले आहेत. (Police) पोलिसांनी पंचनामा करून अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Live Marathi News)

Pachora Crime
Sushma Andhare : फडणवीस- शिंदे यांच्यातील वाद धुसफूस नाही गँगवार पलीकडे गेलाय; सुषमा अंधारे यांची टीका

पाचोरा (Pachora) शहरातील त्र्यंबकनगर व कृष्णापुरी भागात असलेले रेणुका देवी मंदिर व महादेव मंदिरातील दानपेट्या चोरट्यांनी फोडल्या. यातील रेणुका मंदिराच्या दानपेटीतील सुमारे एक लाख ५० हजार रुपयांची रोकड व सोन्याचे दागिने, तसेच महादेव मंदिराच्या दानपेटीतील ८० हजार रुपयांची रोकड (Theft) चोरट्यांनी लांबविण्याचा अंदाज रहिवासी व भाविकांकडून व्यक्त करण्यात आला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Pachora Crime
Toll Plaza : फास्टटॅग व्यतिरिक्त अतिरिक्त पैशांची मागणी; बीड जिल्ह्यातील वैद्यकीन्ही टोल नाक्यावरील प्रकार, वाहनधारक व कर्मचाऱ्यात वाद

मंदिरातील दानपेट्या चोरट्यानी फोडल्याची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी करून पंचनामा केला. यानंतर अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. चोरट्यांनी मंदिरे लक्ष केल्याने परिसरातील रहिवासी व भाविकांमध्ये भीती पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com